
मुंबई: अक्षय्य तृतीया यंदाच्या वर्षी १० मेला साजरी केली जात आहे. यावेळेस अक्षय्य तृतीयेला गुरू-चंद्राच्या युतीने गजकेसरी योगही निर्माण होत आहे.
ज्योतिषानुसार अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग तब्बल १०० वर्षांनी येत आहे. अशातच अक्षय्य तृतीया तीन राशींच्या लोकांसाठी अतिशय नशीबवान ठरू शकते.
मेष - तुम्हाला अचानक धनप्राप्ती होईल. संपत्ती खरेदीचे योग बनत आहेत. तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबात आनंदीआनंदी असेल. मोठ्यांचे आशीर्वाद आणि सहकार्याने महत्त्वाचे काम होईल. एकाग्रता अधिक असल्याने अभ्यासात प्रगती होईल.
कर्क - करिअरमध्ये नवी उंची गाठाल. नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग आहे. इनकम सोर्स वाढतील. पैसे येतील. तुम्हाला एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. धनसंचय अगदी सहज होईल आणि खर्चाला लगाम बसेल. घर-कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
सिंह - कामाच्या ठिकाणी शुभ वार्ता मिळतील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नात्यातील कडवटपणा दूर होईल. यश मिळण्याच्या संधी आहेत. सोबतच पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. उधार अथवा कर्ज दिलेले धन परत मिळेल.