Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीSuresh Raina : क्रिकेटर सुरेश रैनाच्या भावासह आणखी एकाचा रस्ते अपघातात मृत्यू

Suresh Raina : क्रिकेटर सुरेश रैनाच्या भावासह आणखी एकाचा रस्ते अपघातात मृत्यू

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत केला गुन्हा दाखल

शिमला : भारतीय क्रिकेट संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू सुरेश रैनावर (Suresh Raina) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कालच सुरेश रैनाने परळ येथील बाजराला भेट देऊन जांभूळ खरेदी केले होते. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच त्याच्या कुटुंबात एक दुखःद घटना घडली आहे. सुरेश रैनाच्या चुलत भावासह दोन जणांना रस्ता अपघातात (Road Accident) जीव गमवावा लागला आहे. ही ‘हिट अँड रन’ची केस (Hit and run case) असल्याचे गग्गल पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात काल रात्री हा अपघात झाला. सुरेश रैनाचा चुलत भाऊ सौरव कुमार रात्री जवळपास पावणेअकरा वाजेपर्यंत दुकानात काम करत होता. दुकान बंद करुन घरी जात असताना अपघाताची घटना घडली. अपघातानंतर आरोपी पळून गेला, मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला बाजारपेठेतून पकडले. टॅक्सी आणि स्कूटरमध्ये हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११:३० च्या सुमारास गग्गल येथे अज्ञात वाहनाने स्कूटरला धडक दिली. अपघातानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव शेर सिंग असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात दोन्ही स्कूटरस्वारांचा मृत्यू झाला, एकाचे नाव सौरव कुमार तर दुसऱ्याचे नाव शुभम असल्याचे सांगण्यात आले आहे. सौरव हा गग्गल आणि शुभम हे कुठमा येथील रहिवासी होते.

सुरेश रैना सध्या आयपीएल २०२४ मध्ये करतोय कॉमेंट्री

हिमाचलच्या गग्गल परिसरात माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांचे माहेर आहे. रैना आणि त्याच्या कुटुंबासाठी ही दुःखद बातमी आहे. सध्या सुरेश रैना आयपीएल २०२४ मध्ये कॉमेंट्री करताना दिसत आहे. स्पर्धेतील जवळपास सर्वच सामन्यांमध्ये तो कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसून येतो. सुरेश रैनाची कॉमेंट्री चाहत्यांनाही खूप आवडते. त्याच्या बोलण्याच्या शैलीने चाहते प्रभावित होत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -