Saturday, July 20, 2024
Homeक्राईमSalman Khan Firing case : सलमानच्या घरावर गोळीबार करणार्‍या अनुज थापनची आत्महत्या...

Salman Khan Firing case : सलमानच्या घरावर गोळीबार करणार्‍या अनुज थापनची आत्महत्या नव्हे तर हत्या?

कुटुंबियांच्या दाव्याने उडाली खळबळ

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराजवळ १४ एप्रिल रोजी गोळीबार (Firing) करण्यात आला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने हालचाली करत आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, यातील एका आरोपीने अनुज थापनने (Anuj Thapan) काल तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र, आता अनुजच्या कुटुंबियांनी त्याने ही आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे, असा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी अनुजने दोन्ही आरोपींना शस्त्रे पुरवली होती. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तुरुंगात अनुज थापनने आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर त्याला जीटी रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तर दुसरीकडे त्याच्या कुटुंबीयांनी तुरुंगात थापनची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. थापनचा पोस्टमार्टम मुंबईबाहेर करण्याची मागणी कुटुंबीय करत आहेत.

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील इतर दोन आरोपींना जबाब नोंदवण्यासाठी नेण्यात आले होते , त्यावेळी थापन इतर १० आरोपींसह एका कोठडीत होता. सकाळी ११ वाजताच्या सुमारास तो बाथरूममध्ये गेला आणि तिथे त्याने आत्महत्या केली. आरोपी अनुज थापन हा बिष्णोई टोळीशी संबंधित असून त्याच्याविरोधात खंडणी, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -