Amit Shah : निकालाच्या दिवशी दुपारी साडेबाराच्या आधी ४०० पारचं लक्ष्य पार करणार!

भाजपा आणि एनडीए पूर्णपणे ट्रॅकवर


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असून वेगवेगळे दावे काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून केले जात आहेत. मात्र पहिल्या दोन टप्प्यांमध्येच आम्ही १०० हून जास्त जागांवर जिंकून आघाडी घेतली आहे. त्यामुळे ४०० पारचं लक्ष्य आम्हाला फार मोठे वाटत नाही.” असा आत्मविश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केला.


“आमच्या समोर तुल्यबळ म्हणावा असा किंवा आमच्या तोलामोलाचा विरोधक नाही. त्यामुळे मतदानावर एक प्रकारचा परिणाम होतो आहे. आमच्या पक्षाने त्याचे तपशीलवार विश्लेषण केले आहे, असेही शाह (Amit Shah) यांनी सांगितले.


“गाव, शहर, जंगल, वाळवंट, समुद्र किनारे किंवा शहरातले इतर भाग. पायाभूत सुविधांच्या बाबतीत खूप मोठी कामं होत आहेत. भारतीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपये खर्च करणं ही बाब सामान्य नाही. नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांमध्ये जी कामं केली आहेत त्यामुळे देश पुढे जातो आहे. सुवर्णाक्षरांनी लिहावीत अशी ही दहा वर्षे आहेत.” असेही अमित शाह म्हणाले. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पहिल्या दोन टप्प्यांविषयी काय वाटतं आणि लोकसभा निवडणूक कशी सुरु आहे, असा प्रश्न विचारला असता याबाबत अमित शाह (Amit Shah) यांनी सविस्तर भूमिका मांडली.


“भाजपा आणि एनडीए पूर्णपणे ट्रॅकवर आहे. ४ जूनच्या दिवशी म्हणजेच निकालाच्या दिवशी तुम्हाला दिसेल की दुपारी १२.३० च्या आधी एनडीए खासदार संख्या ४०० पार करणार. ४०० पारचं लक्ष्य आम्हाला मोठं वाटत नाही. ते सहज पार होईल.” असा दावा अमित शाह (Amit Shah) यांनी केला आहे.


नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळे १३० कोटी भारतीयांमध्ये हा आत्मविश्वास दुणावला आहे की आपण जगात पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो. रामजन्मभूमी, नवीन आर्थिक धोरण, कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाक संपवणे, फौजदारी कायद्यांमध्ये करण्यात आलेले बदल या महत्त्वाच्या निर्णयांमुळे हे शक्य होणार आहे. तसेच कोरोना सारख्या महामारीशी आपल्या देशाने खूप उत्तम प्रकारे सामना केला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळेच हे शक्य झाले ही जनभावना आहे, असेही शाह (Amit Shah) म्हणाले.

Comments
Add Comment

Vijay and Sangeetha Divorce : 'थलापती' विजय यांच्या संसाराचे वादळ शमले; पत्नी संगीता यांनी घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे

तामिळनाडू : अभिनेते तथा तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या पत्नी संगीता यांनी दाखल केलेला

Kiren Rijiju Statement on Amit Shah : 'ज्या दिवशी अमित शाह उत्तर देतील, ते तुम्हाला ऐकताही येणार नाही!' किरेन रिजिजूंचा विरोधकांवर हल्लाबोल

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या जोरदार गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही

Redmi Note 17 5G Launched : Redmi Note 17 5G भारतात लाँच; ८०००mAh ची तगडी बॅटरी अन् ५०MP कॅमेरा, पाहा किमतीसह सर्व फीचर्स!

नवी दिल्ली : प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी शाओमीने (Xiaomi) आपल्या लोकप्रिय रेडमी नोट सिरीजचा विस्तार करत भारतीय बाजारात

Kochi Flight Emergency Door News : कोचीमध्ये विमानाचे इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न; प्रवाशांमध्ये घबराट, केरळमधील तरुणाला अटक!

कोची : मलेशियाची राजधानी कुआलालंपूरहून केरळच्या कोची शहराकडे येणाऱ्या विमानात बुधवारी रात्री एका प्रवाशाच्या

IRCTC Japan Tour Package : IRCTC ची भन्नाट ऑफर : दिल्ली ते जपान १० दिवसांची मस्त सफर; टोकियो, ओसाका अन् हिरोशिमा फिरण्याची संधी!

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'ने (IRCTC) परदेशात

Assam Crime News : आसाम हादरले! १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; विटांनी ठेचून अत्यंत निघृण हत्या

हैलाकांडी : ईशान्य भारतातील आसाम (Assam) राज्यामधून एका अत्यंत भयानक आणि सुन्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून