Thursday, October 10, 2024
HomeदेशAmit Shah : निकालाच्या दिवशी दुपारी साडेबाराच्या आधी ४०० पारचं लक्ष्य पार...

Amit Shah : निकालाच्या दिवशी दुपारी साडेबाराच्या आधी ४०० पारचं लक्ष्य पार करणार!

भाजपा आणि एनडीए पूर्णपणे ट्रॅकवर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असून वेगवेगळे दावे काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून केले जात आहेत. मात्र पहिल्या दोन टप्प्यांमध्येच आम्ही १०० हून जास्त जागांवर जिंकून आघाडी घेतली आहे. त्यामुळे ४०० पारचं लक्ष्य आम्हाला फार मोठे वाटत नाही.” असा आत्मविश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केला.

“आमच्या समोर तुल्यबळ म्हणावा असा किंवा आमच्या तोलामोलाचा विरोधक नाही. त्यामुळे मतदानावर एक प्रकारचा परिणाम होतो आहे. आमच्या पक्षाने त्याचे तपशीलवार विश्लेषण केले आहे, असेही शाह (Amit Shah) यांनी सांगितले.

“गाव, शहर, जंगल, वाळवंट, समुद्र किनारे किंवा शहरातले इतर भाग. पायाभूत सुविधांच्या बाबतीत खूप मोठी कामं होत आहेत. भारतीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपये खर्च करणं ही बाब सामान्य नाही. नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांमध्ये जी कामं केली आहेत त्यामुळे देश पुढे जातो आहे. सुवर्णाक्षरांनी लिहावीत अशी ही दहा वर्षे आहेत.” असेही अमित शाह म्हणाले. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पहिल्या दोन टप्प्यांविषयी काय वाटतं आणि लोकसभा निवडणूक कशी सुरु आहे, असा प्रश्न विचारला असता याबाबत अमित शाह (Amit Shah) यांनी सविस्तर भूमिका मांडली.

“भाजपा आणि एनडीए पूर्णपणे ट्रॅकवर आहे. ४ जूनच्या दिवशी म्हणजेच निकालाच्या दिवशी तुम्हाला दिसेल की दुपारी १२.३० च्या आधी एनडीए खासदार संख्या ४०० पार करणार. ४०० पारचं लक्ष्य आम्हाला मोठं वाटत नाही. ते सहज पार होईल.” असा दावा अमित शाह (Amit Shah) यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळे १३० कोटी भारतीयांमध्ये हा आत्मविश्वास दुणावला आहे की आपण जगात पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो. रामजन्मभूमी, नवीन आर्थिक धोरण, कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाक संपवणे, फौजदारी कायद्यांमध्ये करण्यात आलेले बदल या महत्त्वाच्या निर्णयांमुळे हे शक्य होणार आहे. तसेच कोरोना सारख्या महामारीशी आपल्या देशाने खूप उत्तम प्रकारे सामना केला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळेच हे शक्य झाले ही जनभावना आहे, असेही शाह (Amit Shah) म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -