Sunday, March 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजनारायण राणेंच्या प्रचारासाठी अमित शाह उद्या रत्नागिरीत

नारायण राणेंच्या प्रचारासाठी अमित शाह उद्या रत्नागिरीत

जवाहर मैदानावर दुपारी १ वाजता होणार जाहीर सभा

रत्नागिरी : मतदानाला आता अवघे काही दिवसच राहिल्याने राजकीय हालचालींना आणि प्रचार सभांना वेग आला आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा रत्नागिरीतील जवाहर मैदानावर ३ मे रोजी दुपारी १ वाजता होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिली.

अमित शाह या सभेनिमित्त प्रथमच येत असून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर २५ ते ३० हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

राणे यांच्या प्रचारासाठी यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राजापूर येथे सभा घेतली. आता अमित शाह येणार आहेत. या सभेकरिता मंडप व्यवस्था पूर्ण झाली आहे. पूर्ण मैदानावर मंडप आहे, त्यात सुमारे २५ ते ३० हजार लोक एका वेळेला बसू शकतात. सभेला येणाऱ्या लोकांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. महायुतीतील सर्व पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी नेतेमंडळी या सभेकरता उपस्थित राहणार आहेत.

सहा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल होणार आहेत, असे रवींद्र चव्हाण म्हणाले. ही सभा ऐतिहासिक होण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत, असेही रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. यापूर्वी अमित शाह यांची सभा २४ एप्रिल रोजी होणार होती मात्र हा नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आला होता. आता ही सभा तीन मे रोजी होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

या सभेसाठी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, किरण सामंत, लोकसभा सहप्रभारी तथा माजी आमदार बाळ माने, बाबा परुळेकर, डॉ. हृषीकेश केळकर, अतुल काळसेकर, सुजाता साळवी, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, प्रमोद जठार, राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजश्री विश्वासराव, प्रमोद अधटराव यांच्यासमवेत, सर्व विधान सभाप्रमुख सर्व पदाधिकारी सक्रिय नियोजन करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -