Friday, July 5, 2024
Homeताज्या घडामोडीZapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे अवतरणार! कशी साधणार ही...

Zapatlela 3 : ‘झपाटलेला ३’ मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे अवतरणार! कशी साधणार ही किमया?

२०२५ मध्ये सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : ‘ओम फट् स्वाहा’ म्हटलं की मराठी प्रेक्षकांना हमखास तात्या विंचू (Tatya Vinchu) आठवतो. पाश्चात्त्य सण हॅलोवीन साजरा करतानाही तात्या विंचू कायम चर्चेत येतो हे ‘झपाटलेला’ (Zapatlela) चित्रपटाचं यश आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘झपाटलेला’ सिनेमाची जादू ३० वर्षांनंतर आजही कायम आहे. यातील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी साकारलेला लक्ष्याही चांगलाच लक्षात राहिला.

सिनेमाचा दुसरा भाग ‘झपाटलेला २’ (Zapatlela 2) देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) लक्ष्याच्या मुलाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र चित्रपट पाहताना कायम लक्ष्याची उणीव भासत होती. यानंतर आता चित्रपटाच्या तिसर्‍या भागाची तयारी सुरु करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या भागात प्रेक्षकांना लक्ष्याची उणीव भासणार नाही, कारण लक्ष्मीकांत बेर्डे पडद्यावर अवतरणार आहेत. आजच्या काळात सगळं काही सहज शक्य करणार्‍या एआय तंत्रज्ञानाच्या (AI Technology) मदतीने ही किमया साधली जाणार आहे.

‘झपाटलेला ३’ (Zapatlela 3) हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या भक्कम असणार आहे. चित्रपटाच्या अनुषंगाने काही तांत्रिक गोष्टींसाठी आपण ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याचे महेश कोठारे यांनी काही दिवसांपूर्वी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘झपाटलेला २’ मध्ये 3D तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. हा मराठीतील पहिला 3D चित्रपट ठरला होता. यानंतर आता एआयच्या मदतीने दिवंगत अभिनेत्याला पडद्यावर आणणारा देखील ‘झपाटलेला ३’ हा मराठीतील पहिला चित्रपट ठरु शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -