नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ बुधवारी जाहीर करण्यात आला. नेतृत्त्वाची धुरा मिचेल मार्शकडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर ॲश्टन अगर, टीम डेव्हिड आणि नॅथन एलिस यांनाही संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे. संघातील बहुतांश खेळाडू २०२२ टी-२० विश्वचषक आणि २०२३ वनडे विश्वचषक संघाचा भाग होते. मात्र काही दिग्गज खेळाडूंना स्थान देण्यात आलेले नाही.
स्टीव्ह स्मिथ, जेक फ्रेझर मॅकगर्क, जेसन बेहरेनडॉर्फ, अष्टपैलू मॅट शॉर्टला वगळले
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेला संघात ऑस्ट्रेलिया दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ, दिल्ली कॅपिटल्सचा स्फोटक फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्क, अनुभवी वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ आणि अष्टपैलू मॅट शॉर्ट यांना स्थान मिळालेले नाही.
खराब कामगिरीनंतरही ग्रीनला संघात स्थान
खराब फॉर्म असूनही ग्रीनला संघात स्थान देण्यात आले आहे. स्टॉइनिसनेही या मोसमात विशेष कामगिरी केलेली नाही. ऑस्ट्रेलियन निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली म्हणाले की, संघाला १५ पर्यंत मर्यादित ठेवणे नेहमीच आव्हान असते आणि आम्हाला फक्त महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करावे लागते. हा एक संतुलित संघ आहे आणि टी-२० विश्वचषकाच्या नवव्या आवृत्तीत चमकदार कामगिरी करण्याची क्षमता आहे.या संघात खूप अनुभव आहे. हा संघ खेळाच्या प्रत्येक पैलूचा समावेश करेल आणि वेस्ट इंडिजमध्ये यशस्वी होईल.
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघ : मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा.