Thursday, July 3, 2025

सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला. अनुज थापन असे या आरोपीचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.


१४ एप्रिल रोजी सलमानच्या घराबाहेर दोन व्यक्तींनी गोळीबार केला होता. पोलिसांनी या घटनेतील काही आरोपींना अटक केली आहे.


गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरील गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले होते की, "या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल. हा महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे, इथे कुठलीही टोळी नसून पूर्ण ‘अंडरवर्ल्ड’ संपले आहे. आम्ही बिश्नोईला संपवू. पुन्हा कोणीही असा हल्ला करण्याची हिंमत करणार नाही अशी कारवाई करू."


दरम्यान, विक्की गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) या दोन आरोपींना देखील पोलिसांनी अटक केली होती. हे दोघेही बिहारमधील चंपारण येथील रहिवासी आहेत. तर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक सुरतमधील तापी नदीमध्ये सापडली. यावेळी काही जिवंत काडतूसही सापडले.


सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विक्की गुप्ता आणि सागर पाल या तरुणांनी चौकशीदरम्यान सांगितले होते की, सलमानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर ते मुंबईहून रस्त्याने सुरतला पोहोचले होते. येथून ते रेल्वेने भुजला गेले. तेथे प्रवासादरम्यान त्यांनी रेल्वे पुलावरून पिस्तूल तापी नदीत फेकले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा