Friday, June 13, 2025

T20 World Cup : एक जूनपासून टी२० वर्ल्डकपचा थरार!

T20 World Cup : एक जूनपासून टी२० वर्ल्डकपचा थरार!

९ जूनला भारत पाकिस्तान सामना रंगणार!


रोहित शर्मा कर्णधार तर हार्दिक पांड्या उपकर्णधार


नवी दिल्ली : टी२० वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) भारतीय संघाची आज बीसीसीआयकडून (BCCI) घोषणा करण्यात आली आहे. टी२० वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने १५ खेळाडूंची निवड केली आहे. या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करणार आहे तर उपकर्णधारपदी हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) निवड करण्यात आली आहे.


बीसीसीआयने मोठा निर्णय घेत ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि संजू सॅमसनला (Sanju Samson) संघात स्थान दिले आहे. तर रिंकू सिंग, शुभमन गिल, आवेश खान आणि खालील अहमदला राखीव ठेवले आहे. मात्र के. एल. राहुलला (K.L.Rahul) डावलण्यात आले आहे.


टी२० वर्ल्डकपमध्ये भारताचे स्थान अ गटात आहे. भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड विरुद्ध होणार आहे तर ९ जून रोजी भारत पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार आहे. यूएसए विरुद्ध १२ जून रोजी तर १५ जून रोजी भारतीय संघ कॅनडा विरुद्ध सामना खेळणार आहे.


भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.



असे आहेत विश्वचषक गट.. 


अ गट- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका


ब गट- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान


क गट- न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी


ड गट- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ



वर्ल्डकपसाठी टीम इंडिया


फलंदाज - ४


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,


अष्टपैलू - ४


हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शिवम दुबे,


विकेट कीपर - २


ऋषभ पंत, संजू सॅमसन,


फिरकीपटू - २


कुलदीप यादव, युजवेंद्र चहल,


वेगवान गोलंदाज - ३


अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

Comments
Add Comment