
लखनऊ: उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथील एका महिलेने आपल्या दोन मुलांना घेत विहीरीत उडी मारली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे महिलेच्या पतीने त्याच्या आईला २०० रूपये खर्चाला दिले होते. त्याचमुळे पत्नी चिडली होती.
एकाच घरातील तिघांच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मृतदेह हाती घेत पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत. ही घटना गावात चर्चेचा विषय बनली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही संपूर्ण घटना मणिकपूर कस्बेच्या डीह गावातील आहे. येथील एका महिलेने आपल्या दोन मुलांना घेऊन विहीरीत उडी घेतली. यात त्या तिघांचाही मृत्यू झाला आहे. महिलेचे नाव अंजू आहे आणि तिचे वय २२ वर्ष होते. घरगुती वादातून ही दुर्घटना घडली.
चित्रकूटचे पोलीस अधीक्षक अरूण कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावात राहणाऱ्या मृत महिलेच्या पतीने तिच्या आईला खर्चासाठी २०० रूपये दिले होते. त्यानंतर तो आपल्या चेहऱ्याच्या झालेल्या ऑपरेशनची पट्टी करण्यासाठी रुग्णालयात गेला. जेव्हा तो घरी परतला तेव्हा पत्नी आणि त्याची मुले दिसली नाहीत.
त्याने आपली पत्नी आणि मुलांचा शोध सुरू केला. मात्र कुठेच पत्ता लागत नसल्याने तो टेन्शनमध्ये आला. तब्बल दोन तासांनी दुसऱ्या गावातून आलेल्या काही लोकांना रस्त्यावरील विहीरीत एका महिलेचा मृतदेह दिसल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी तेथे धाव घेतली.
याची माहिती मिळताच पतीने पोलिसांसह तेथे धाव घेतली असता पत्नी आणि त्याच्या दोन मुलांचे मृतदेह आढळले. या घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगाने गावात पसरली. स्थानिकांच्या मदतीने तीनही जणांचे मृतदेह बाहेर काढले.
मृत महिलेच्या पतीने आपल्या आईला २०० रूपये खर्चासाठी दिले होते. यावरून अंजू चिडली होती. अंजूने यावरून भांडण सुरू केले. दोघांमध्ये प्रचंड वादावादी झाली. यानंतर पती रुग्णालयात गेला. संध्याकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याला मुले आणि पत्नी दिसली नाही. भरपूर शोध घेतल्यानंतर तिघांचे मृतदेह विहीरीत आढळले.