Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींची १० मेला पिंपळगावला जाहीर सभा

पंतप्रधान मोदींची १० मेला पिंपळगावला जाहीर सभा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली माहिती

नाशिक : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आम्ही सर्व पूर्ण शक्तीने उतरणार आहोत. दोन तारखेला अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणुकीने जाणार आहोत. त्याच्या आधी नाशिकच्या महायुतीच्या उमेदवाराची घोषणा होईल. १० मेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाशिकच्या पिंपळगावला जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळ फार्मवर छगन भुजबळांची भेट घेतली. यावेळी दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार, नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव, माजी आमदार बाळासाहेब सानप आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर छगन भुजबळ आणि डॉ. भारती पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आम्ही सर्व पूर्ण शक्तीने उतरणार आहोत. दोन तारखेला अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणुकीने जाणार आहोत. तोपर्यंत नाशिकच्या जागेचा उमेदवार देखील कदाचित १-२ दिवसांत जाहीर होईल. आम्ही पूर्ण ताकदीने दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी जाणार आहोत. तसेच १० मेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची पिंपळगावला जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -