Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Mobile: उन्हाळ्याच्या दिवसांत होऊ शकतो मोबाईलचा स्फोट, असा ठेवा सुरक्षित

Mobile: उन्हाळ्याच्या दिवसांत होऊ शकतो मोबाईलचा स्फोट, असा ठेवा सुरक्षित

मुंबई: मोबाईलचा स्फोट(mobile blast) झाल्याच्या बातम्या कुठून ना कुठून सतत कानावर येत असतात. अशा घटनांमागची कारणे अनेक असू शकतात. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसांत अशा घटना घडण्याच्या शक्यता अधिक असतात. खरंतर, स्मार्टफोन्स आणि छोट्या डिव्हाईसमध्ये फार कमी जागेत अधिक क्षमतेची बॅटरी असते. अशातच स्मार्टफोन युजर्सनी खूपच सावधानता बाळगली पाहिजे. जाणून घेऊया फोनमध्ये आग कशी लागते, याचे कारण काय आहे आणि यापासून बचावासाठी काय करता येईल.


खरंतर, स्मार्टफोनचा स्फोट होण्याच्या अधिकाधिक घटना बॅटरीमुळे होतात. जेव्हा फोन उन्हाच्या संपर्कात अधिक येतो तेव्हा बॅटरी गरम होते. अधिक तापमान वाढल्याने तसेच फोनचे कव्हर अतिशय जाड असल्यासही ही समस्या येते. याशिवाय फोनवर अधिक दबाव पडल्यास अथवा बराच वेळ वापरल्याने तो गरम होतो.



खराब क्वालिटीच्या स्वस्त चार्जरचा वापर करू नका


खराब क्वालिटीच्या स्वस्त चार्ज अथवा केबलचा वापर केल्याने बॅटरीमध्ये शॉट सर्किट होऊ शकतो. अनेक फोन्ससोबत आजा चार्जिंग अॅडॉप्टर मिळत नाही. अशातच जुगाड करून चार्ज करण्याच्या नादात चुकून ब्लास्ट होण्याची शक्यता वाढते. तसेच दीर्घकाळ फोन चार्जिंगला लावल्यानेही स्फोटाची शक्यता वाढते.



मोबाईलची बॅटरी जुनी झाल्यास वाढतो धोका


जर तुमच्या फोनची बॅटरी जुनी झाल्यास अथवा खराब झाली असेल तर स्फोटाचा धोका अधिक वाढतो. जर तुमच्या फोनची बॅटरी फुगली असेल तर तातडीने जवळच्या सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवून घ्या. उन्हाळ्याच्या दिवसांत बॅटरी सुरक्षित ठेवणे अधिक गरजेचे असते.



बराच वेळ गेम खेळल्यानेही होतो परिणाम


जर तुम्ही मोबाईलवर बराच वेळ मोबाईल बघत असाल अथवा व्हिडिओज बघत असाल तर फोन गरम होऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांत फोन जास्त वापरला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.



या गोष्टी ठेवा ध्यानात


आपले गॅजेट्स उशी, चादरीच्या खाली ठेवून चार्ज करू नका. कारण यामुळे डिव्हाईस आणखी गरम होऊ शकतात.


मोबाईल फोन जर खूप गरम झाला असेल तर तो लगेचच स्विच ऑफ करा. तसेच मोबाईलचे कव्हर काढून ठेवा. यामुळे तो थंड होईल.

Comments
Add Comment