
माढा : धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या ज्वारीला आता श्रीअन्न (Jwari Bhakri) म्हणून आम्ही नवीन ओळख दिली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जगातील प्रत्येकाच्या ताटापर्यंत ज्वारी पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. याचा ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
अमेरिकेतील राष्ट्रपतींनी मला काही दिवसांपूर्वी जेवणाला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांच्या व्हाईट हाऊस मध्ये त्यांनी माझ्यासाठी मोठी पार्टी आयोजित केली होती. भारतीय पंतप्रधानासाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या सर्वात महत्त्वपूर्ण आणि मजेशीर गोष्ट म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी त्या दिवशी रात्री जेवताना सर्वांसाठी श्रीअन्न म्हणजेच ज्वारीची भाकरी जेवणासाठी ठेवली होती, अशी माहिती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.