MI vs LSG: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने लखनौच्या एकना स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडून नेहल वढेराने 46 धावांची खेळी केली तर टीम डेव्हिडने 18 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या.
लखनौ सुपर जायंट्सने प्रथम गोलंदाजी करत मुंबईची अवस्था 4 बाद 27 धावा अशी केली होती. त्यानंतर सलामीवीर इशान किशन आणि नेहलने 53 धावांची भागीदारी रचत मुंबईला 80 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र इशान किशन 32 धावा करून बाद झाला.
मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊकडून मार्कस स्टोयनिस याने 62 धावांची खेळी केली. स्टोयनिसने लखनऊसाठी सर्वाधिक धावा केल्या. तर कॅप्टन केएल राहुल याने 28 धावा जोडल्या. दीपक हुड्डाने 18 रन्स केल्या. एश्टन टर्नर याने 5 आणि आयुष बदोनीने 6 रन्स केल्या. मुंबईकडून कॅप्टन हार्दिक पंड्या याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर नुवान तुशारा, जेराल्ड कोएत्झी आणि मोहम्मद नबी या तिघांनी 1-1 विकेट घेतली. तर निकोलस पूरन आणि कृणाल पंड्या या जोडीने लखनऊला विजयी केलं. निकोलसने नाबाद 14 धावा केल्या. तर कृणाल 1 रन करुन माघारी परतला.