Lok Sabha Election 2024: काँग्रेसला ६० वर्षात जमले नाही ते या सेवकाने १० वर्षात करून दाखवले - पंतप्रधान मोदी

मुंबई: महाराष्ट्रातील माढा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Pm narendra modi) आज निवडणुकीच्या प्रचाराची सभा घेतली. यावेळी येथील विशाल जनसमुदायाला संबोधित करताना मोदी म्हणाले, भाजप-एनडीए सरकार महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचे काम करत आहे.


पंतप्रधान मोदी म्हणाले गेल्या १० वर्षात तुम्ही मला जेव्हापासून काम करण्याची संधी दिली मी माझ्या शरीरातील कण न कण तसेच प्रत्येक क्षण तुमच्या सेवेत अर्पण केला आहे. आज देशातील लोक, महाराष्ट्रातील लोक मोदी सरकारची १० वर्षे आणि काँग्रेस सरकारची ६० वर्षे यातील फरक बघत आहेत. काँग्रेसला जे ६० वर्षांत जमले नाही ते तुमच्या या सेवकाने १० वर्षांत करून दाखवले आहे.


पंतप्रधान पुढे म्हणाले, महाराष्ट्राची जनता जेव्हा प्रेम आणि आशीर्वाद देते तेव्हा कोणतीच कसर मागे सोडत नाही. मात्र जेव्हा कोणी दिलेले वचन पूर्ण करत नाही तेव्हा महाराष्ट्राची जनता ते लक्षातही ठेवते आणि वेळ आल्यास हिशोबही पूर्ण करते.


पंतप्रधान मोदींनी यावेळी विरोधी पक्षावर हल्लाबोल करताना म्हटले, १५ वर्षांपूर्वी एक मोठे नेते येथे निवडणूक लढवण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी मावळत्या सूर्याची शपथ घेऊन म्हटले होते की येथील दुष्काळ प्रभावित क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचवू मात्र त्यांनी आपले वचन पूर्ण केले नाही. आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे.



काँग्रेसच्या १०० पैकी ६३ योजना आम्ही पूर्ण केल्या - पंतप्रधान मोदी


पंतप्रधान म्हणाले, विदर्भ असो मराठवाडा असो थेंबथेब पाण्यासाठी वाट पाहायला लावण्याचे पाप गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. काँग्रेसला देशाने ६० वर्षे राज्य करण्याची संधी दिली. या ६० वर्षांत जगातील अनेक देश पूर्णपणे बदलले मात्र काँग्रेसला शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवता आले नाही. २०१४मध्ये साधारण १०० सिंचन योजना अशा होत्या ज्या अनेक दशकांपासून तशाच होत्या. यातील २६ योजना महाराष्ट्रातील होत्या. विचार करा किती मोठा धोका काँग्रेसने महाष्ट्राला दिला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, २०१४मध्ये सरकार बनल्यानंतर मी पूर्ण शक्ती सिंचन योजनांवर लावली. काँग्रेसने लटकवलेल्या १०० योजनांपैकी ६३ योजना आम्ही पूर्ण केल्या. प्रत्येक शेतात, प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवणे हे माझ्या जीवनाचे मोठे मिशन आहे.



शेतकऱ्यांचा पैसा लुटत होता पंजा - पंतप्रधान मोदी


पंतप्रधान मोदी म्हणाले, मोदी गावातील आपल्या बहिणींना सशक्त करण्यामध्ये गुंतले आहेत. गेल्या १० वर्षात आमच्या प्रयत्नांनी एक कोटी लखपती दीदी बनल्या आहेत. आता मोदींची ही गॅरंटी आहे की मी ३कोटी बहिणींना लखपती बनणार आहे. आधी दिल्लीतून शेतकऱ्यांच्या नावावर थोडे जरी पैसै निघत होते तेव्हा काँग्रेसचा पंजा ते लुटत होता मात्र दिल्लीत बसलेला तुमचा मुलगा आहे.
Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी