Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीCovishield Covid Vaccine : लस बनवणाऱ्या कंपनीने कोर्टात दिली कोरोना लसीचे शरीरावर...

Covishield Covid Vaccine : लस बनवणाऱ्या कंपनीने कोर्टात दिली कोरोना लसीचे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याची कबूली!

नवी दिल्ली : कोरोना काळामध्ये जगभरातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरलेल्या कोरोना लस निर्मिती करणा-या कंपनीने (Covishield Covid Vaccine) या लसीचे शरीरावर दुष्पपरिणाम होत असल्याची कबूली ब्रिटनच्या कोर्टात दिली आहे.

कोरोना लस बनवणारी कंपनी एस्ट्रझेनेकाने कोर्टात सांगितले की, त्यांच्या कोरोना लसीमुळे टीटीएस म्हणजे थ्रोम्बोसईटोपेनिया सिंड्रोम म्हणजे शरीरात रक्ताच्या गाठी निर्माण करण्यास कारणीभूत ठरणारे दुष्पपरिणाम होऊ शकतात. ज्यामुळे व्यक्तीला स्ट्रोक येणे, ह्रदय बंद पडणे, यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

या कंपनीची कोविशील्ड नावाची कोरोना लस भारतातल्या नागरिकांना दिली गेली आहे. त्यामुळे भारतासाठी देखील ही अतिशय चिंताजनक बाब आहे.

Corona side effects : कोरोनाचे ‘साईड इफेक्ट्स’ आता आले समोर!

भारतीय कंपनी सीरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया आणि एस्ट्रझेनेकाने एकत्र येत भारतात कोरोना लसीची निर्मिती केली होती. त्याचा वापर केवळ भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये निर्यात केली गेली. काही ठिकाणी या लसीला व्हॅक्सजेवरिया म्हणून देखील ओळखले गेले.

ब्रिटनमध्ये जेमी स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने या कंपनीवर खटला दाखल केला आहे. त्याचे म्हणणे आहे की, ही लस घेतल्यानंतर तो ब्रेन डॅमेजच्या समस्येला सामोरा गेला आहे. तसेच अनेक कुटुंबांनी याबद्दल तक्रार केली आहे. तसेच त्यांनी कंपनीकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ब्रिटनने या लसीवर बंदी घातली आहे.

दरम्यान भारतात देखील असे मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे भारतात देखील कंपनीकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -