Saturday, October 18, 2025
Happy Diwali

कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर भ्रष्टाचाराचे आरोप

कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर भ्रष्टाचाराचे आरोप

चीनच्या सरकारने केले निलंबित

बिजिंग : चीनच्या पहिल्या कोविड - १९ वरील लस निर्मिती करणाऱ्या टीमचे नेतृत्व करणाऱ्या चीनमधील सर्वात मोठ्या लस निर्मात्या कंपनीतील वरिष्ठ शास्त्रज्ञ यांग शिओमिंग यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राष्ट्रीय विधानमंडळाच्या उपपदावरून निलंबित करण्यात आले आहे. चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसने (एनपीसी) शुक्रवारी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, यांग यांच्यावर 'शिस्त आणि कायद्याचे गंभीर उल्लंघन' केल्याचा आरोप आहे.

स्थायी समितीच्या चार दिवसांच्या बैठकीनंतर झालेल्या एनपीसीच्या विधानात सूचित केले होते की, यांगची आधीच पक्ष शिस्तपालन संस्था - केंद्रीय शिस्त तपासणी आयोगाकडून चौकशी केली जात आहे.

मागच्या काही वर्षांपासून राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी देशात भ्रष्टाचारविरोधी मोहीम हाती घेतली आहे. यांग यांची बरखास्ती ही भ्रष्टाचारविरोधी अभियानाचा एक भाग असल्याचं बोललं जात आहे. चीनमधील आरोग्य यंत्रणेतील ही सर्वात मोठी कारवाई समजली जातेय.

यांग हे एक अनुभवी शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी सीएनबीजीमध्ये लस बनवणाऱ्या टीमचं नेतृत्व केलं होतं. या टीमनेच सिनोफार्मा बीबीआयबीपी-कोरवी व्हॅक्सिन बनवली होती. चीनची ही पहिली कोरोना व्हॅक्सिन होती. चीनच्या या पहिल्या लशीला सार्वजनिक उपयोगाकरीता मान्यता देण्यात आलेली होती. विशेष बाब म्हणजे यांग शिओमिंग यांना सप्टेंबर २०२० मध्ये त्यांच्या कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >