Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीनांदरुख गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध : भाजपा नेते निलेश राणे

नांदरुख गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध : भाजपा नेते निलेश राणे

मालवण : नांदरुख गावच्या विकासकामांना प्राधान्य देत, गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे भाजपा नेते निलेश राणे यांनी नांदरुख येथे बोलताना स्पष्ट केले.

नांदरुख सरपंच भाऊ चव्हाण यांसह सदस्य दशरथ पोखरणकर, नम्रता महादेव चव्हाण, राजश्री सत्यविजय कांबळी, समीक्षा चव्हाण तसेच अनेक ग्रामस्थांनी निलेश राणे यांच्या उपस्थितीत नांदरुख कुरले भाटले वाडी येथे आयोजित कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्त्या सर्वांचे निलेश राणे यांनी भाजप पक्षात स्वागत केले.

केंद्रीय मंत्री राणे साहेबांचे विशेष प्रेम या गावावर आहे. राणे साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व गावात जास्तीत जास्त विकासनिधी देण्याचा प्रयत्न नेहमीच राहिला. नांदरुख गावातही विकासनिधी देण्याचा प्रयत्न कायम राहील. या गावातील पाणी प्रश्न, रस्ते या समस्या प्राधान्याने सोडवताना ग्रामस्थांना अपेक्षित असलेल्या विकासकामाना १०० टक्के प्राधान्य दिले जाईल. असा विश्वास निलेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला.

यावेळी भाजपा प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, भाजप युवामोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक प्रयास भोसले, भाजप जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, चौके माजी सरपंच राजा गावडे, अशोक चव्हाण, आत्माराम चव्हाण यांसह प्रवेश अन्य प्रवेशकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी दत्ता सामंत, बाबा मोंडकर यांनी विचार मांडताना राणे साहेबांसोबत असलेला हा गाव लोकसभा निवडणुकीत ८० टक्के मताधिक्य देईल असा विश्वास व्यक्त केला. गावात आमदार, खासदार तसेच याआधी सत्ता होती त्यांनी काही केले नाही. पाण्याचे स्रोत नसताना केवळ पाईपलाईन टाकण्याचे काम सूरू आहे. मात्र भाजपच्या माध्यमातून राणे साहेबांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल. रस्तेही डांबरीकरण होतील असे सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -