Friday, December 13, 2024
Homeक्राईमTrafficking in illegal money : दादर येथे कारमध्ये आढळली तब्बल १ लाख...

Trafficking in illegal money : दादर येथे कारमध्ये आढळली तब्बल १ लाख ८० हजारांची रोकड!

निवडणुकीच्या काळात घडला बेकायदेशीर प्रकार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात आचारसंहिता (Code of conduct) लागू झाल्याने निवडणूक आयोग (Election Commission) राजकीय नेते व राजकीय पक्षांच्या प्रत्येक हालचालीवर व वक्तव्यावर बारीक नजर ठेवून आहे. आचारसंहितेचा भंग होत नसल्याची दखल आयोगाकडून घेतली जात आहे. यासाठी ठिकठिकाणी निवडणूक आयोगाचे पथक, पोलीस अन् आयकर विभागाची नजर कायम आहे. मात्र, अशातच दादरसारख्या अत्यंत वर्दळ असलेल्या ठिकाणाहून एक मोठी बातमी समोर आली आहे. आचारसंहिता काळात रोख रक्कम बाळगण्यास निर्बंध असताना दादरच्या शिंदेवाडी परिसरात एका कारमधून लाखो रुपयांची रोकड जप्त (Mumbai Cash Seized) करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दादरच्या शिंदेवाडी परिसरात एक कारमध्ये तब्बल १ लाख ८० हजारांची रोकड होती. ही सर्व रोकड ५०० रुपयांच्या करकरीत नोटांच्या स्वरुपात होती. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी गाडी अडवून तपासणी केली असता ही रोकड आढळली. निवडणूक भरारी पथकाने भोईवाडा पोलिसांच्या मदतीने रक्कम जप्त केली. या पैशांबाबत चालकाकडे कोणतीही कागदपत्रे आढळून न आल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे.

निवडणूक काळात प्रामुख्याने रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. मुंबईत राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून तसेच बाहेरील राज्यांमधून दररोज अनेक गाड्यांची वाहतूक होत असते. त्यातूनही पैशांची वाहतूक होण्याची शक्यता आहे. मतदारांना भुलवण्यासाठी याचा वापर केला जातो. ते रोखण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे अनेक ठिकाणी तपासणी नाके उभारले जातात आणि संशयित वाहनांना थांबवून त्यांची तपासणी केली जाते.

त्यामुळे मुंबई शहर, उपनगर तसेच मुंबई लगतच्या शहरांमधील एन्ट्रीवर नाकाबंदी करण्यात आली असून गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. मतदानाच्या आधीचे चार दिवस हे अतिशय महत्त्वाचे असून, या दिवसांत सुरक्षा दलाची कुमक वाढवली जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -