
मुंबई: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४ची(t-20 world cup 2024) सुरूवात होण्यास फक्त काही दिवसच बाकी राहिले आहेत. यावेळेस टी-२० वर्ल्डकप यूएसए आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमानपदाखाली १ ते २९ जूनदरम्यान खेळवला जाणार आहे. टी-२० वर्ल्डकप २०२४साठी सर्व २० देशांना १ मेपर्यंत आपला संघ घोषित करायचा आहे.
अहमदाबादमध्ये होणार निवड समितीची बैठक
टी-२० वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघाने आपल्या संघाची घोषणा केली. मात्र भारतीय संघाची अद्याप घोषणा झालेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार टी-२० वर्ल्डकपसाठी आपल्या संघाची ३० एप्रिलला केली जाऊ शकते. यासाठी अहमदाबादमध्ये उद्या निवड समितीची बैठक पार पडणार आहे. यानंतर संघाची घोषणा केली जाऊ शकते. संघाचे नेतृत्व रोहित शर्माच्या हाती असणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आधीच याला दुजोरा दिला आहे.
संजूलाही मिळू शकते संधी
रोहित शर्मासोबत विराट कोहली आणि टी-२०मधील नंबर १ फलंदाज सूर्यकुमार यादव टी-२० वर्ल्डकपच्या संघात असणे निश्चित मानले जात आहे. तर सलामीवीर यशस्वी जायसवाल आणि रिंकू सिंह यांनाही वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळू शकते. विकेटकीपर फलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास ऋषभ पंत आणि संजू सॅमसन वर्ल्डकप संघात असू शकतात.
ऑलराऊंडसबद्दल बोलायचे झाल्यास हार्दिक पांड्याला संधी मिळू शकते. शिवम दुबेलाही संघात प्रवेश मिळण्याची संधी आहे. तर रवींद्र जडेजा आणि अक्षऱ पटेल यांपैकी एकाला संधी मिळू शकते.
मोहम्मद सिराजची एंट्री होणार?
स्पिन गोलंदाज म्हणून कुलदीप यादव, रवी बिश्नोई आणि युझवेंद्र चहल यांच्यापैक दोघांना संधी मिळू शकते. फास्ट बॉलरमध्ये जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह यांचे स्थान पक्के आहे. तर मोहम्मद सिराजलाही तिसरा स्पेशलिस्ट वेगवान गोलंदाज म्हणून सामील केले जाऊ शकते.