
DC VS KKR: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात सलामीवीर पृथ्वी शॉची १३ धावांवर वैभव अरोराने त्याची विकेट घेतली. त्यानंतर मिचेल स्टार्कने जेक फ्रेझर-मॅकगर्क १२ धावांवर व्यंकटेश अय्यरच्या हातात झेल देत बाद केले.
दरम्यान, शाई होपला ६ धावांवर बाद करत अरोराने त्याची दुसरी विकेट मिळवली. धोकादायक दिसणारा, अभिषेक पोरेल आपली सुरुवात मजबूत करू शकला नाही, तो १५ चेंडूत १८ धावांवर बाद झाला. वरुण चक्रवर्तीने ऋषभ पंत २७ धावा आणि ट्रिस्टन स्टब्स ४ धावांवर यांच्या मोठ्या विकेट्स मिळवल्या. त्यानंतर अक्षर पटेलला १५ धावा करत सुनील नरेनच्या चेंडुवर बाद झाला. आणि डीसीच्या पुनरागमनाची आशा संपुष्टात आली. यानंतर चक्रवर्तीने कुमार कुशाग्रला काढून तिसरी विकेट मिळवली. कुलदीप यादव आणि लिझाद विल्यम्स नाबाद राहिले. दिल्ली २० षटकात १५३ धावांपर्यंत पोहचु शकली.
कोलकाता नाईट रायडर्सने १५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना फिल सॉल्टने झटपट अर्धशतक झळकावले.अक्षर पटेलने सुनील नारायणला बाद करत झटका दिला.पण तोपर्यंत ७९ धावा झाल्या होत्या. त्यानंतर अक्षरने सॉल्टला ६८ धावांवर बाद केले. लिझाद विल्यम्सने रिंकू सिंगची विकेट घेतली.
श्रेयस अय्यर ३३ धावा आणि व्यंकटेश अय्यर २६ धावा बनवत नाबाद राहिले. कोलकाताने १६.३ षटकांत १५७ धावांपर्यंत मजल मारली, आणि सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर सात गडी राखून विजय मिळवला.