पुणे : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभरात मोठमोठ्या राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. त्यातच भाजपचे पुण्यातील लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुण्यात दाखल होणार आहेत. येथे त्यांची जाहीर सभा होणार असून या सभेला प्रचंड प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्याच्या वाहतुकीत (Pune Traffic) मोठे बदल करण्यात आले आहेत. आज सकाळपासूनच नियोजित रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. त्यामुळे पुणेकरांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागेल. या सगळ्यामुळे पुणेकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद
सोलापुर रोडवरील अर्जुन रोड जं. ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार रस्ता बंद
बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद
गोळीबार मैदान चौक लुल्लानगर ते इच्छित स्थळी
भैरोबानाला ते लुल्लानगर ते इछित स्थळी
वॉर मेमोरीयल ते घोरपडी ते डोबारवाडी मार्गे बी.टी. कवडे रोडने इच्छित स्थळी
मोरओढा सदन कमांड कौन्सिल हॉल ब्लू नाईल मार्गे इच्छित स्थळी
पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी स्थानिक प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच तयारीला सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी अवकाश उड्डाणावर निर्बंध घालणारे आदेश जारी केले होते. त्यामुळे पुण्यात २७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ३० एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन इत्यादी प्रकारच्या अवकाश उड्डाणास मज्जाव असेल.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात राज्यात सभा घेणार आहेत. २९ आणि ३० एप्रिल रोजी महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सहा सभांचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतीच मोदींनी कोल्हापूरमध्ये सभा घेतली होती. त्यानंतर आज पुण्यात त्यांची सभा होईल. तर मंगळवारी पंतप्रधान मोदी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माढा लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. मोदींची सभा म्हणजे विजयाची खात्री अशी महायुतीमधील उमेदवारांची धारणा आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांकडून मोदींच्या सभांसाठी आग्रह धरला जात आहे.
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…