
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचे ४६ सामने खेळवले गेले आहेत आतापर्यंत एकचा असा संघ आहे ज्यांनी प्लेऑफसाठी जागा निश्चित केल्याचे दिसत आहे. तर ५ संघ असे आहेत ज्यांचे गुण समान आहे तर ३ संघाची स्थिती खूपच खराब आहे. आयपीएलच्या पुढील टप्प्यात जाण्यासाठी या संघांचा संघर्ष सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दोन विजय मिळवत आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहे मात्र त्यांचा बाहेर जाण्याचा धोका अद्याप कायम आहे.
संजू सॅमसनचा संघ राजस्थान रॉयल्सने या हंगामात जबरदस्त खेळ केला आहे. त्यांनी ९ सामने खेळल्यानंतर ८ सामन्यांमध्ये विजय मिळवत १६ गुण मिळवले. त्यामुळे या संघाचे प्लेऑफमध्ये पोहोचणे निश्चित झाले आहे. पॉईंट्सटेबलमध्ये ते अव्वल स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर कोणता संघ असेल याचा निर्णय कठीण होत चालला आहे.
५ संघाचे समान गुण
राजस्थान रॉयल्सचा संघ सोडला तर स्पर्धेत इतर संघासाठी चढ-उतारानी भरलेली होती. कोलकाता नाईटरायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडे ५ सामन्यातील विजयाचे १० गुण आहे. यात केवळ दिल्लीनेच १० सामने खेळले आहेत. तर कोलकाताने ९ सामने खेळले आहेत. तर इतरांनी ९ सामने खेळले आहेत. अशातच श्रेयस अय्यरच्या संघाला दुसऱ्या स्थानावर जाण्याची मोठी संधी आहे.
३ संघावर बाहेर जाण्याची नामुष्की
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग ६सामन्यांत पराभव स्वीकारल्याने त्यांचा मार्ग कठीम झाला आहे. गेल्या दोन सामन्यात संघाने भले विजय मिळवला असेल मात्र ४ सामन्यानंतरही त्यांचे १४ गुण होतील. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्याकडे ५ सामने शिल्लक आहेत. दोघांचे ६ गुण आहेत. सर्व सामने जिंकून ते १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. मात्र एकही सामना जरी हरले तरी प्लेऑफमध्ये जाण्यासाठी नेट रनरेटवर अवलंबून राहावे लागेल.