Monday, December 2, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वstock market : शेअर बाजार करेक्शनच्या चक्रात

stock market : शेअर बाजार करेक्शनच्या चक्रात

गुंतवणुकीचे साम्राज्य – डॉ. सर्वेश सुहास सोमण

या आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजात शेअर बाजारात थोड्या प्रमाणात तेजी झाली. त्यानंतर निर्देशांक सलग २ दिवस रेंजमध्ये राहिले. गुरुवारी निर्देशांकात मोठी तेजी पाहावयास मिळाली. गुरुवारी या महिन्यातील वायदा बाजाराची एक्सपायरी झाली. गुरुवारच्या या एक्सपायरीच्या दिवशी निर्देशांकामध्ये दिवसाच्या पहिल्या सत्रापासूनच वाढ झाली आणि ही तेजी मार्केट बंद होईपर्यंत कायम राहिली.

या महिन्याची निर्देशांक निफ्टीची एक्सपायरी २२५७०ला झाली. निर्देशांकाची दिशा ही तेजीची असून, मध्यम मुदतीसाठी निर्देशांक निफ्टीची २१७५० ही महत्त्वाची पातळी आहे. जोपर्यंत निर्देशांक या पातळीच्या वर आहेत, तोपर्यंत निर्देशांकामधील तेजी कायम राहील. अल्पमुदतीच्या चार्टनुसार निर्देशांक रेंज बाऊंड स्थितीत आहेत. त्यामुळे पुढील कालाचा विचारकरिता त्यामुळे शेअर्समध्ये व्यवहार करीत असताना, निर्देशांकाच्या वरील पातळ्या लक्षात ठेवूनच, शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

शेअर बाजारात या आठवड्याच्या वाढीमध्ये हडको, मोतीलाल ओसवाल, वेदांता यांनी सहभाग घेतला. कच्चे तेलाची ६७५० ही अत्यंत महत्त्वाची पातळी असून, जोपर्यंत कच्चे तेल या पातळीच्यावर आहे, तोपर्यंत अल्पमुदतीच्या चार्टनुसार कच्चे तेलातील तेजी टिकून राहील. करन्सी मार्केटमध्ये डॉलरदेखील अजूनही रेंज बाऊंड असून तो ८३.५० रुपये ते ८१.५० रुपये या मर्यादित किमतीत हालचाल करीत आहे. अल्पमुदतीच्या चार्टनुसार आता डॉलरची गती ही तेजीची असून डॉलर जोपर्यंत ८१.५० या पातळीच्या वर आहे. तोपर्यंत यापुढे डॉलरमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र डॉलर ८३.५० ही पातळी ओलांडत नाही, तोपर्यंत होणारी वाढ ही मर्यादित असेल. दीर्घमुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची दिशा अजूनही तेजीचीच असून, सध्या होत असलेली घसरण ही तेजीनंतर आलेली मंदी अर्थात करेक्शन आहे. त्यामुळे शेअर बाजारातील होणाऱ्या प्रत्येक घसरणीत दिग्गज कंपन्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

गुंतवणूक करीत असताना, बऱ्याच वेळा आपण शेअर अल्पमुदतीसाठी घेतला असेल आणि त्यानंतर जर त्या शेअरमध्ये घसरण झाली, तर बरेच गुंतवणूदार शेअरची किंमत खरेदी किमतीपेक्षा खाली आली म्हणून स्टॉपलॉस न लावता, तो घेतलेला शेअर लाँग टर्म म्हणून ठेवून देतात आणि त्यामुळे गुंतवणूक अडकून पडते. गुंतवणूक करीत असताना, आपला त्या शेअरमधील गुंतवणुकीचा कालावधी तो घेण्यापूर्वीच ठरवणे आवश्यक आहे म्हणजे आपली गुंतवणूक अडकणार नाही.

(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -