Monday, July 15, 2024
Homeक्राईमIllegal Work In Mall : धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली केले 'असे' काही

Illegal Work In Mall : धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली केले ‘असे’ काही

काळजाचा थरकाप उडवणारी घटना; जाणून घ्या नक्की प्रकरण काय?

नागपूर : अनेक ठिकाणी काळे धंदे, काळाबाजार सुरु असल्याचे भयंकर प्रकार समोर येत असताना अशातच नागपूरमधून एक दक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूर येथे जरीपटका भागातील एका मॉलमध्ये सलून स्पा सेंटरच्या आडून देहव्यापराचा गोरखधंदा सुरू असल्याचा काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. (Nagpur Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, जरीपटका भागात सुरू मॉलमध्ये रिलॅस्क स्पा हेअर अँड ब्युटी लॉजमध्ये परराज्यातील महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. आर्थिक मजबुरीचा फायदा घेत देहव्यापार चालवला जात होता. याप्रकरणी पोलीस विभागाच्या सामाजिक सुरक्षा पथकाने तीन पीडित महिलांची सुटका केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी देहव्यापार (Prostitution) चालवणाऱ्या रक्षा शुक्ला असे नाव असलेल्या महिलेला ताब्यात घेतलं असून तिच्यावर कारवाई केली आहे. याप्रकरणात समावेश असलेल्या आणखी दोघांचा शोध सुरू आहे. मोहम्मद नासीर अब्दुल शकुर भाटी आणि फिरोज अब्दुल शकुर भाटी अशी फरार आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ३ महिलांची सुटका केली आहे.

हे तिघेही आपल्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवत होते. त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होते. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला याप्रकरणाची माहिती मिळाली. माहिती मिळताच जरीपटका येथील जिंजर मॉलमधील रिलॅक्स स्पा द हेअर अँड ब्यूटीवर धाड टाकली. यावेळी या स्पामध्ये आलिशान रूम कंपार्टमेंट तयार करून देहव्यापार सुरू असल्याची माहिती पीआय सामाजिक सुरक्षा विभाग नागपूर कविता इसारकर यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -