Google layoffs : गुगलचा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांची केली हकालपट्टी

'या' योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे होत आहेत हाल


मुंबई : गुगल दरवेळी नवे नवे अपडेट देण्याचा प्रयत्न करत असते. अशातच आता गुगलने मोठा निर्णय घेतला आहे. कमी खर्च करण्याच्या योजनेमुळे गुगलने गेल्या काही आठवड्यांत अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. तर आता गुगल पुन्हा त्याच्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करत असल्याचे समोर आले आहे. गुगलने रिअल इस्टेट आणि फायनान्स विभागातील कर्मचारी कमी केल्याचा अहवाल आल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गुगलने युनायटेड स्टेटबाहेरील कमी पगारात काम करणारे कर्मचारी नियुक्त केले आहेत. खर्च कमी करण्याच्या गुगलच्या या योजनेमुळे संपूर्ण टीमला कामावरून कमी करण्यात आले आहे. याचा परिणाम कंपनीतील पायथन विभागातील कर्मचाऱ्यांवर झाला आहे. तर आता गुगल कंपनीने म्युनिक, जर्मनी येथे कमी पगारात काम करणारी एक नवी टीम स्थापन करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे ही कर्मचारी कपात केली असल्याची शक्यता आहे असा दावा अहवालात करण्यात आला आहे.


गुगलच्या वित्त प्रमुख रुथ पोराट यांनी कर्मचाऱ्यांना असे सांगितले आहे की, ही कंपनी बंगळुरू, मेक्सिको सिटी आणि डब्लिनवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कंपनीच्या पुर्नरचनेचा भाग म्हणून ही कर्मचारी कपात केली आहे.


तसेच आर्थिक अनिश्चिततेच्या काळात, जगभरातील तंत्रज्ञान कंपन्या त्यांचा खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी नोकऱ्या कमी करत आहेत. याच कारणामुळे गुगलशिवाय ॲमेझॉन, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या अनेक टेक कंपन्यांनी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Comments
Add Comment

‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

टोकियो : जगात अनेक रहस्यमय आणि अनोखी ठिकाणे आहेत; पण जपानमधील एका बेटाने आपल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो

ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! युक्रेन विरूद्ध रशिया युद्धासंबंधी चीनसोबत करणार चर्चा

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

थायलंड  : बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई  : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो

‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

टोकियो  : जगात अनेक रहस्यमय आणि अनोखी ठिकाणे आहेत; पण जपानमधील एका बेटाने आपल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना