Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीGoogle layoffs : गुगलचा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांची केली हकालपट्टी

Google layoffs : गुगलचा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांची केली हकालपट्टी

‘या’ योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे होत आहेत हाल

मुंबई : गुगल दरवेळी नवे नवे अपडेट देण्याचा प्रयत्न करत असते. अशातच आता गुगलने मोठा निर्णय घेतला आहे. कमी खर्च करण्याच्या योजनेमुळे गुगलने गेल्या काही आठवड्यांत अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. तर आता गुगल पुन्हा त्याच्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करत असल्याचे समोर आले आहे. गुगलने रिअल इस्टेट आणि फायनान्स विभागातील कर्मचारी कमी केल्याचा अहवाल आल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुगलने युनायटेड स्टेटबाहेरील कमी पगारात काम करणारे कर्मचारी नियुक्त केले आहेत. खर्च कमी करण्याच्या गुगलच्या या योजनेमुळे संपूर्ण टीमला कामावरून कमी करण्यात आले आहे. याचा परिणाम कंपनीतील पायथन विभागातील कर्मचाऱ्यांवर झाला आहे. तर आता गुगल कंपनीने म्युनिक, जर्मनी येथे कमी पगारात काम करणारी एक नवी टीम स्थापन करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे ही कर्मचारी कपात केली असल्याची शक्यता आहे असा दावा अहवालात करण्यात आला आहे.

गुगलच्या वित्त प्रमुख रुथ पोराट यांनी कर्मचाऱ्यांना असे सांगितले आहे की, ही कंपनी बंगळुरू, मेक्सिको सिटी आणि डब्लिनवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कंपनीच्या पुर्नरचनेचा भाग म्हणून ही कर्मचारी कपात केली आहे.

तसेच आर्थिक अनिश्चिततेच्या काळात, जगभरातील तंत्रज्ञान कंपन्या त्यांचा खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी नोकऱ्या कमी करत आहेत. याच कारणामुळे गुगलशिवाय ॲमेझॉन, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या अनेक टेक कंपन्यांनी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -