सोलापूर : आम्ही कुणाचाच अधिकार काढून न घेता सामान्य वर्गातील गोरगरीब लोकांना न्याय देण्याचे काम केले. सामान्य वर्गाला आम्ही १० टक्के आरक्षण दिले. त्यानंतर कुठेच पुतळे जाळले, काही आंदोलन झाले असे काही घडले नाही तर सर्वांनी स्वागत केले. आम्ही समाजात भेद निर्माण नाही केला तर समाजाला जोडण्याचा आमचा सामाजिक व्यवहार आहे. काँग्रेसने मात्र एससी, एसटी, दलित यांच्यासोबत विश्वासघात केला. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर, बाबु जगजीवन राम यांचा कायम अपमान केला. तसेच, ओबीसी, दलित नेतृत्वं काँग्रेसने पुढे येऊ दिले नाही, असा घणाघाती आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला.
आज सोलापूर येथे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी काँग्रेससह उद्धव ठाकरे आणि संजय राऊत याचाही खरपूस समाचार घेतला. काँग्रेसच्या काळात आदिवासी, दलित, ओबीसी यांचे अधिकार कमी करण्याचे काम झाले. कारण हे लोक आपल्याला मतदान करत राहावेत यासाठी काँग्रेसने त्यांना आश्रीत ठेवले, असा थेट आरोप मोदींनी यावेळी केला.
आता विरोधकांनी मोदी सरकार आरक्षण संपवतील, संविधान बदलतील, असा प्रचार सुरू केला आहे. परंतु, आज बाबासाहेब आंबेडकर आले तरी ते आरक्षण संपवू शकत नाहीत. मोदींचा तर प्रश्नच येत नाही, असा दावा मोदींनी केला. आमच्या विचारात काही खोट होती तर आज जे सोबत जनमत आहे ते सोबत नसते असे म्हणत मी कर्ज मिटवण्याचे काम करत आहे. जास्तीत जास्त जागा यासाठी पाहिजेत की, काँग्रेस ओबीसी, एसटी, दलित यांचे आरक्षण मुस्लिमांना देऊ पाहत आहे. कारण यांनी कर्नाटकमध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण दिले आहे. ते देशात होऊ द्यायचे नाही म्हणून मोदींना मजबूत करा, असेही मोदी यावेळी म्हणाले.
काँग्रेस देशाची सत्ता मिळवण्याची स्वप्न पाहत आहे. पण त्यांना माहित नाही की, निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातच काँग्रेससह इंडिया आघाडीचा पत्ता गुल झाला आहे. तसेच इंडिया आघाडीमध्ये नेतृत्वावरून संघर्ष सुरू आहे. त्यामुळे अशा लोकांच्या हातात तुम्ही देशाची सत्ता देणार का? असा सवाल मोदी यांनी यावेळी जनतेला विचारला.
तसेच इंडिया आघाडीच्या संघर्षातून एक नवा फॉर्मुला समोर आला आहे. तो म्हणजे पाच वर्ष पाच पंतप्रधान असणार आहेत. प्रत्येक वर्षी नविन पंतप्रधान देशाला भेटणार आहे. तसेच नकली शिवसेना देखील म्हणत आहे की, आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक लोक आहेत. त्यांच्याच एका नेत्याने म्हटले की, आम्ही चार वर्षात चार पंतप्रधान केले तरी काय होईल? असे म्हणत मोदी यांनी पंतप्रधानपद मिळवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली.
एवढा मोठा देश अशा प्रकारच्या फॉर्मुल्यांनी चालणार आहे का? असा सवाल यावेळी मोदींनी केला. तसेच इंडिया आघाडीला सत्ता मिळवण्याचा हा एकच मार्ग बाकी राहिला आहे. कारण त्यांना देश चालवायचा नाही, त्यांना जनतेच्या भविष्याची चिंता नाही तर सत्तेची मलई मिळवायची आहे. असे म्हणत मोदींनी काँग्रेस, इंडिया आघाडीसह ठाकरे-राऊतांवर टीका केली.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…