Saturday, July 13, 2024
Homeक्राईमCrime : ऐकावं ते नवलच; सासूवर प्रेम जडल्याने सुनेने केली शरीरसुखाची मागणी!

Crime : ऐकावं ते नवलच; सासूवर प्रेम जडल्याने सुनेने केली शरीरसुखाची मागणी!

पतीपासूनही विभक्त व्हायला सून तयार

लखनऊ : प्रेम या संकल्पनेबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. आईमुलाचं, बापलेकीचं, नवरा-बायकोचं, भावाबहिणीचं नातं आणि त्यातलं प्रेम आपण आयुष्याच्या वेगवेग्या टप्प्यांवर अनुभवत असतो. अनेक प्रेमकहाण्या आपण आजूबाजूला पाहतही असतो. मात्र, उत्तरप्रदेशच्या बुलंदसहर भागातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. यामध्ये सुनेला तिच्या सासूवर प्रेम जडलं आहे. इतकंच नव्हे तर यासाठी तिने सासूकडे शरीरसुखाचीही मागणी केली. सून आपल्या पतीपासून विभक्त व्हायला तयार असून तिला आयुष्य सासूसोबत घालवण्याची इच्छा आहे. या घटनेमुळे सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत.

खरं तर सासू आणि सुनेमध्ये आईमुलीचं नातं असतं. पण या विचित्र प्रकाराने सर्वांनाच थक्क केलं आहे. या प्रकरणी सासूने पोलिसांना सांगितलं की, सुनेला सासूशी शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, त्यासाठी ती जबरदस्तीने मोबाईलवर आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवते. सासूने सुनेच्या विरोधात एसएसपी कार्यालय जाऊन तक्रारही दाखल केली आहे. सुनेच्या या कृत्याने त्रस्त झालेल्या सासूने प्रशासनाकडे मदतीचे आवाहन केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सून सासूच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली आहे की, ती आपल्या पतीला सोडून सासूसोबतच आयुष्य घालवण्यास तयार आहे. सून सासूसोबत जगण्या-मरण्याची वचनं घेण्यासही तयार आहे. सून सासूला आपल्या सोबत ठेवून शरीरसुखाची मागणी करते. सून सासूला आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवून तस करण्यासाठी दबाव टाकते, अशी माहिती समोर येत आहे. सासूने याविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. पोलिसांनी तक्रार पत्र महिला कक्षाकडे तपासासाठी पाठवलं आहे.

सूनेला पतीपासून विभक्त व्हायचंय

महिलेने सांगितलं की, सुनेचे मुलाशी लग्न होऊन २ वर्षे झाली पण आजपर्यंत तिला मूल नाही. सूनेला पतीपासून विभक्त व्हायचं आहे तर, सुनेसह तिचे आई-वडील वेगळे होण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी करत आहेत. पीडित महिलेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आपल्या सुनेबद्दल या सर्व गोष्टी सांगत आहे. पीडित महिलेने दिल्लीहून बुलंदशहर येथील एसएसपी मुख्यालय गाठून तक्रार दाखल केली.

सध्या पोलिसांनी महिलेला तिच्या तक्रार पत्राबाबत तपासासाठी महिला कक्षाकडे पाठवले आहे. या प्रकरणी महिला सेलच्या प्रभारींनी तपास सुरू असून तपासात समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -