Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीSummer Hair Care : उन्हाळ्यात केसांची काळजी सतावते आहे का? मग घ्या...

Summer Hair Care : उन्हाळ्यात केसांची काळजी सतावते आहे का? मग घ्या केसांची ‘अशी’ काळजी

मुंबई : उन्हाळ्याच्या वाढत्या कडाक्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यातील प्रचंड उकाडा आणि लागणाऱ्या तीव्र झळांमुळे त्वचा आणि केसांवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे, या दिवसांमध्ये त्वचेसोबतच केसांची ही खास काळजी घेणे गरजेचे आहे. ऊन, धूळ आणि घामामुळे केस लगेच खराब व चिकट होऊन जातात. त्यामुळे, केस कोरडे आणि खराब दिसू लागतात. सूर्याच्या या अतिनील किरणांमुळे केवळ आरोग्यच नाही तर केसांनाही हानी पोहचते. त्यामुळे उन्हाच्या दिवसांत आरोग्यासोबत केसांचीही योग्य काळजी घेणे आवश्यक असते.

सूर्याच्या या अतिनील किरणांमुळे केसांमधील क्युटिकल नष्ट होतात. ज्यामुळे, केस तुटू लागतात तसेच उन्हामुळे केसांचा रंग ही उडतो. त्यामुळे, केस मोठ्या प्रमाणात खराब होतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही केसांची खास काळजी घेण्यासाठी असे काही सोपे उपाय करु शकता.

केसांना हेअर मास्क लावा

केस कोरडे होणे आणि केसगळतीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही हेअर मास्कचा वापर करू शकता. हेअर मास्क हा केसांसाठी एक प्रभावी उपाय आहे. हेअर मास्कमध्ये शीया बटर आणि आर्गन ऑईलसारखे डीप कंडिशनिंग एजंट असतात. ज्यामुळे, केसांना छान फायदा होतो. हा हेअर मास्क तुम्ही केसांना शॅम्पू करण्यापूर्वी लावू शकता किंवा केसांना शॅम्पू केल्यानंतर ही केसांना लावू शकता.

कंडिशनर लावा

केसांचे संरक्षण करण्यासाठी केसांना शॅम्पू लावल्यानंतर कंडिशनरचा वापर करा. यामुळे, केस मुलायम होण्यास मदत होते आणि ओले केस वाळल्यानंतर त्यातील गुंता कमी होतो. शिवाय, केसांना छान पोषण ही मिळते. या व्यतिरिक्त केसांना कंडिशनर लावल्यामुळे केसगळती आणि केसांमध्ये फाटे फुटण्याची समस्या कमी होते.

स्कार्फचा वापर करा

उन्हाळ्यात केसांची देखभाल करण्यासाठी आणि केसांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फचा अवश्य वापर करा. स्कार्फचा वापर केल्यामुळे केसांचा आणि त्वचेचा उन्हापासून बचाव केला जाईल. त्यामुळे, उन्हाळ्यात घरातून बाहेर पडताना स्कार्फ बांधा, यामुळे केस खराब होणार नाहीत.

मोठ्या कंगव्याचा करा वापर

उन्हाळ्यात तुमच्या केसांसाठी रूंद-दात असलेला कंगव्याचा वापर अवश्य करा. कंगव्याने केस विंचरण्यापूर्वी केसांना हेअर सीरम लावा. यामुळे, केस तुटणार नाहीत. ओल्या केसांवर कधीच कंगव्याचा वापर करू नका, हे नेहमी लक्षात ठेवा. केस वाळल्यानंतर ते कंगव्याने विंचरा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -