Monday, August 4, 2025

GT vs RCB: जॅक्स-कोहलीसमोर गुजरातने टेकले गुडघे, आरसीबीने ९ विकेटनी जिंकला सामना

GT vs RCB: जॅक्स-कोहलीसमोर गुजरातने टेकले गुडघे, आरसीबीने ९ विकेटनी जिंकला सामना

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला ९ विकेटनी हरवले. या सामन्यात विराट कोहलीने ७० धावांची खेळी करत आरसीबीला आयपीएल २०२४मध्ये तिसरा विजय मिळवून दिला. गुजरातने पहिल्यांदा खेळताना २०० धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूच्या संघाने हे आव्हान २४ बॉल राखत पूर्ण केले.


आरसीबीची सुरूवात चांगली राहिली. मात्र फाफ डू प्लेसिस १२ बॉलमध्ये २४ धावा करून बाद झाला होता. येथून विराट कोहली आणि विल जॅक्स यांच्यात १६६ धावांची भागीदारी झाली. या दरम्यान ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले गेले. दुसरीकडे जॅक्सने सुरूवातीला संघर्ष केला. मात्र ४१ बॉलमध्ये १०० धावा करत आरसीबीला ९ विकेटनी विजय मिळवून दिला.


फाफ डू प्लेसिस बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि विल जॅक्सने ताबडतोब अंदाजात बॅटिंग केली. पहिल्या १० ओव्हरमध्ये संघाने १ बाद ९८ धावा केल्या होत्या. पुढील ५ षटकांत कोहली आणि जॅक्स मिळून ७९ धावा केल्या होत्या. यानंतर आरसीबीचा स्कोर १५ षटकांत १७७ धावा इतका झाला होता. शेवटच्या ५ षटकांत त्यांना विजयासाठी २४ धावांची गरज होती. मात्र कोहली आणि जॅक्स या सामन्याला खूप खेचू शकले नाहीत. १६व्या ओव्हरमध्येच विल जॅक्सने २९ धावा करत बंगळुरूला विजय मिळवून दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा