मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराचे काही ना काही आजार सुरूच होता. यातील एक म्हणजे डोकेदुखी. आज आपण जाणून घेणार आहोत की डोकेदुखी काय आहे आणि तो त्रास कमी करण्यासाठी काय उपाय करता येतील.
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातून खूप घाम येत असतो. यामुळे पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्स वेगाने कमी होतात. यामुळे डिहायड्रेशनची समस्या सतावते. डिहायड्रेशनमुळे ब्लड व्हॉल्यूम कमी होतो आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजनची पूर्तता कमी होते. यामुळे डोकेदुखीची समस्या सतावते.
उच्च तापमानाचा सरळ परिणाम आपल्या शरीरावर होत असल्याने शरीराचे तापमान वाढू लागते. यामुळे हीट स्ट्रोक अथवा हीट एक्सहॉस्शनचा धोका वाढतो. यामुळेही डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी दिवसभरातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या. यामुळे डिहाड्रेशनपासून आराम मिळेल तसेच डोकेदुखीची शक्यताही कमी होईल. दुपारच्या वेळेस जेव्हा ऊन खूप असेल तेव्हा बाहेर पडू नका. जर बाहेर जाणे गरजेचे असेल तर शरीर जितके जास्त झाकले जाईल याची काळजी घ्या. घरातील वातावरण थंड आणि आरामदायक ठेवा. एसी अथवा पंख्याचा वापर करा.