Sunday, November 2, 2025
Happy Diwali

बॉयफ्रेंडच्या एका सल्ल्याने तरुणीचे उजळले नशीब; बनली लखपती

बॉयफ्रेंडच्या एका सल्ल्याने तरुणीचे उजळले नशीब; बनली लखपती

चक्क ४१ लाखांची लागली लॉटरी

वॉशिंग्टन डी.सी : जगभरात कोणाचं नशीब कधी व कसं बदलेल काही सांगता येत नाही. कोणाला अनेक गोष्टींमध्ये फायदा होतो तर कोणाला नुकसान. अशीच एक घटना समोर आली आहे. एका मुलीला तिच्या बॉयफ्रेंडने असा सल्ला दिला होता, जो ऐकल्यानंतर ती लखपती झाली. तिने तब्बल ५०,००० डॉलर म्हणजेच जवळपास ४१ लाख रुपये जिंकले आहेत.

अमेरिकेत मेरीलँडयेथे राहणारी ब्रिन असे या मुलीचं नाव आहे. या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडने लॉटरीचं तिकीट खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. तिला हे करायचं नव्हतं. मात्र मुलाने अनेकवेळा सांगितल्यामुळे तिने तिकीट विकत घेतले. मुलीने १० डॉलर म्हणजे ८३४ रुपयांना तिकिट खरेदी केलं होतं. लकी ड्रॉबद्दल माहिती मिळाल्यानंतर तिने मेरीलैंड लॉटरी एपवर स्कॅन केलं. मेरीलँड लॉटरीच्या रिलीझनुसार, ब्रिन घरी आली आणि तिचे तिकीट स्क्रैच केलं.

मेरीलैंड लॉटरी एपवर तिचं तिकीट अनेक वेळा तपासलं, तेव्हा तिला समजलं की तिने बक्षीस म्हणून मोठी रक्कम जिंकली आहे. ती म्हणाली की, "मी किंचाळत होते कारण माझा विश्वास बसत नव्हता. मी इतक्या जोरात ओरडले की मला वाटलं माझ्या शेजाऱ्यांना माझा आवाज ऐकू गेला. मला खूप आनंद झाला कारण जेव्हा तुम्ही जिंकण्याची अपेक्षा करत नाही आणि तसं काही घडतं. हे पैसे कसे खर्च करणार हे माहीत नाही." असे ब्रिनने सांगितले.

दरम्यान, ब्रिनने ट्रक खरेदी करून हा पैसा आपल्या व्यवसायात गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. तर ब्रिनला ४१ लाखांची लॉटरी लागल्यामुळे आजुबाजुच्या परिसरात आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment