Wednesday, July 17, 2024
Homeक्रीडाIPL 2024RR VS LSG: राजस्थानने मोडलं लखनौचं आव्हान, प्ले ऑफच्या दिशेने 'रॉयल'...

RR VS LSG: राजस्थानने मोडलं लखनौचं आव्हान, प्ले ऑफच्या दिशेने ‘रॉयल’ वाटचाल…

RR Vs LSG: राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या टेबल-टॉपरच्या लढतीमध्ये राजस्थान नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनौसाठी खेळताना केएल राहुलने ४८ चेंडुत ७६ धावा करत बोल्टच्या हातात झेल देत बाद झाला. पण त्यानंतर  दीपक हुडाने आक्रमक खेळी करत लखनौचा खेळ सावरला.त्याच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सन एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचु शकली. लखनौने २० षटकात ५ गडी गमावत १९६ धावांचे आव्हान राजस्थान समोर उभारले.

लखनौने उभ्या केलेल्या धावसंख्येचा पाठलाग राजस्थानने आक्रमकपणेच केला. पण राजस्थानचे सलामीचे फलंदाज खास काही करु शकले नाहीत. यशस्वी जयस्वाल २४ धावा करुन तर बटलर ३४ धावा करुन बाद झाला. त्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजु सॅमसन मैदानात उतरला आणि त्याने संघासाठी नाबाद खेळी केली. त्याला ध्रुव जुरेलने 34 चेंडूत नाबाद 52 धावा साथ दिली.संजू आणि ध्रुवने 123 धावांची नाबाद भागादारी रचली. सॅमसनने 33 चेंडूत 71 धावा संघाला विजय मिळवुन दिला.

राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 7 विकेट्सनी पराभव करत प्ले ऑफच्या दिशेने कूच केली आहे. राजस्थानचा हा सलग चौथा विजय आहे. आतापर्यंतच्या 9 सामन्यापैकी राजस्थानने 8 सामने जिंकले आहेत. त्यातील 6 सामन्यात त्यांनी चेस करत सामना जिंकला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -