Friday, March 21, 2025
Homeक्रीडाIPL 2024DC Vs MI: दिल्लीने दिला मुंबईला शह, १० धावांनी जिंकला सामना

DC Vs MI: दिल्लीने दिला मुंबईला शह, १० धावांनी जिंकला सामना

DC Vs Mi: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीचा फलंदाज फ्रेजर-मैक्गर्कने फक्त २८ चेंडूत ८४ धावा करत पावरप्लेमध्येच संघाची धावसंख्या शंभरापार लावली. त्यानंतर आलेल्या शाय  होपने १७ चेंडूत ४१ धावा तर स्टब्सने २५ चेंडूत ४८ धावा करत संघाची आक्रमक खेळी सुरुच ठेवली. दिल्लीने 20 षटकात 4 गडी गमवून 257 धावा केल्या. आणि मुंबईसाठी  258 धावांचं आव्हान दिले.

दिल्लीने दिलेल्या २५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजीला उतरले होते. त्यांनी चांगली सुरुवातही केली होती. ईशान आक्रमक खेळत होता, तर दुसरी बाजू रोहितने सांभाळली होती. परंतु, रोहितला खलील अहमदलने बाद केले. चौथ्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शाय होपकडे झेल देत बाद झाला. रोहितने ८ चेंडूत ८ धावा केल्या.

पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मुकेश कुमारने ईशान किशनचा अडथळा दूर केला. ईशानने मुकेशविरुद्ध मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्याचा झेल अक्षर पटेलने घेतला. त्यामुळे ईशानला १४ चेंडूत २० धावा करून माघारी परतावे लागले. सूर्यकुमारने ३ चौकार आणि २ षटकार मारत आक्रमकता दाखवली, पण ६ व्या षटकात खलील अहमदने त्याला परत पाठवले.

अखेरच्या षटकात मुंबईला २५ धावांची गरज होती. सर्वांच्या नजरा तिलक वर्मावर खिळल्या. पण दोन धावांसाठी धावताना पंतने त्याला धावबाद केले. तिलकने ६३ धावा केल्या. त्यातच अखेरच्या चेंडूवर पीयुष चावला शाय होपकडे झेल देत 10 धावांवर बाद झाला. त्यामुळे मुंबईचा डाव 20 षटकात 9 बाद 247 धावांवर संपला. त्यामुळे हा सामना दिल्लीने 10 धावांनी जिंकला.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -