Tuesday, July 1, 2025

तारक मेहता फेम रोशनसिंह सोढी चार दिवसांपासून बेपत्ता!शोध सुरू

तारक मेहता फेम रोशनसिंह सोढी चार दिवसांपासून बेपत्ता!शोध सुरू

मुंबई: टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा(tarak mehta ka ooltah chashma) फेम रोशन सिंग सोढी उर्फ गुरचरण सिंह बेपत्ता झाले आहे. २२ एप्रिलला त्यांना शेवटचे पाहिले गेले होते. त्यानंतर ते घरी आलेले नाहीत.


गुरूचरण सिंह यांच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलीस तपास करत आहे. साधारणपणे ४ दिवस आधी गुरचरणने वडिलांचा बर्थडे सेलिब्रेट केला होता.


सोशल मीडियावर त्यांचा ४ दिवस जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात गुरचरण आपल्या वडिलांसह खुश दिसत आहेत. कॅमेऱ्यामध्ये पोझ देत आहेत. वडीलही गुरचरणला आशीर्वाद देत आहेत. पोलीस अभिनेत्याचा शोध घेत आहेत. वडिलांनी सांगितले की पोलिसांनी आश्वासन दिले आहे की ते लवकरच अभिनेत्याचा शोध घेतील.


अनेक वर्षे गुरचरणने तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारली होती. या मालिकेतून अनेकजण त्यांचे चाहते झाले. मात्र एक वेळ अशी आली की जेव्हा गुरचरणने शोला अलविदा म्हटले. निर्मात्यासंग तूतू-मैमै होणे आणि क्रिएटिव्ह इश्यूज ही कारणे सांगितली जात होती.


गुरचरणने सांगितले की निर्मात्यांनी त्यांना पगार दिला नव्हता. याच कारणामुळे ते शोमधून बाहेर पडले. यानंतर गुरूचरण कोणत्याही शोमध्ये दिसले नव्हते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >