मुंबई: चेहरा सुंदर बनवण्यासाठी लोक विविध प्रयत्न करत असतात. अशातच काही लोक साबणाचा वापर खूप करतात मात्र तुम्हाला माहीत आहे की साबणाचा वापर करणे योग्य असते की नाही?
चेहऱ्यावर सरळ साबण लावणे धोकादायक ठरू शकते. साधारणपणे चेहऱ्यावर साबण लावणे योग्य नसते. कारण साबणामध्ये कठोर केमिकल असतात जे त्वचा कोरडी होऊ शकते. तसेच खाजही येऊ शकते. काही साबणामध्ये डिटर्जंट असतात ज्यामुळे त्वचा निस्तेज होते.
साबणाचा वापर केल्याने त्वचेवर पिंपल्स येण्याची शक्यता वाढते. यामुळे त्वचेची जळजळ तसेच लालसरपणा येण्याची शक्यता असते. साबणाचा वापर केल्याने त्वचेला नुकसान पोहोचते. जर तुमची तेलकट त्वचा असेल कर ऑईल फ्री साबणाचा वापर करा.
दरम्यान, तुमच्या स्किनला साबण सूट होत असेल तर दिवसातून एकदा हलक्या हातांनी एकदा अथवा दोनवेळा साबणाचा वापर करा. चेहरा साबण धुतल्यानंतर मॉश्चरायजरचा वापर करा.
यामुळे त्वचा संतुलित राखण्यास मदत करेल. याशिवाय क्लिंजिंग मिल्क आणि ऑईल क्लिंजरचा वापर करू शकता. लक्षात ठेवा काही लोकांना साबणामुळे अॅलर्जी होऊ शकते. जर असे घडले तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.