नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान २६ एप्रिल २०२४ला सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात १३ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील ८९ लोकसभा जागांवर मतदान होत आहे. मतदान संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहील. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात केरळच्या सर्व २० जागांवर मतदान होत आहे. यात राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघाचाही समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये राजनांदगाव येथून भूपेश बघेल, बंगळुरी ग्रामीण येथून डीके सुरेश, बंगळुरू उत्तर येथून शोभा करंदलाजे, बंगळुरू दक्षिण येथून तेजस्वी सूर्या, वायनाड येथून राहुल गांधी, तिरूअनंतपुरम येथून शशी थरूर, मथुरा येथून हेमा मालिनी यांचा समावेश आहे.
राज्यातून बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघासाठी मतदान होत आहे. अकोला मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर, परभणी येथून संजय जाधव , यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांच्यात लढाई आहे. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर उभे आहेत.
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १३ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील ८८ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात १५ कोटी ८८ लाख मतदार आहेत. दुसऱ्या टप्प्यात केरळमध्ये सर्वाधिक २० जागांवर मतदान होत आहे. राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघातही आज मतदान होत आहे. मोदी सरकारमधील ६ मंत्री आणि २ माजी मुख्यमंत्र्यांचा निर्णय आज होत आहे. आज ४ राज्यांतील मतदानाचे काम संपेल.