Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीvoter slip घरी आली नाही तर स्वत: करू शकता डाऊनलोड, ही आहे...

voter slip घरी आली नाही तर स्वत: करू शकता डाऊनलोड, ही आहे सोपी पद्धत

मुंबई: भारतात १८व्या लोकसभेसाठी निवडणूक सुरू झाली आहे. ही निवडणूक सात टप्प्यात पार पडत आहे. यातील पहिला टप्पा १९ एप्रिलला पार पडला. यात १०२ जागांसाठी मतदान झाले. तर दुसरा टप्पा २६ एप्रिलला होत आहे. यात ८९ मतदारसंघांचा समावेश आहे. यात मतदार मतदान करणार आहेत. मतदानासाठी कोणत्याही मतदाराकडे वोटर स्लिप असणे गरजेचे असते.

मतदारांच्या यादीत नाव असल्यानंतर मतदारांना वोटर स्लिप दिली जाते. मात्र अनेकदा वोटर स्लिप मतदारांपर्यंत पोहोचत नाही. जर तुमच्याकडेही मतदानासाठी वोटर स्लिप आलेली नाही तर तुम्ही घरबसल्या ही डाऊनलोड करू शकता.

अशी करा डाऊनलोड

जर तुमच्याकडे वोटर स्लिप आलेली नाही तर वेबसाईटच्या माध्यमातूनही डाऊनलोड करू शकता. यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईट https://voters.eci.gov.in/ वर जावे लागेल. यानंतर तुम्हाला सर्च इन इलेक्टोरल रोल ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्याकडे सर्च करण्यासाठी ऑप्शन येतील.

यात सर्च बाय EPIC, सर्च बाय मोबाईल आणि सर्च बाय डिटेलेस दिले असेल. यातील एका पर्यायामध्ये माहिती भरून आणि कॅप्चा भरून तुम्हाला सर्चवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. यात अॅक्शनवर क्लिक करून तुम्हाला डाऊनलोडचा पर्याय मिळेल.

दुसरा पर्याय

तुम्ही वोटर हेल्पलाईन अॅपच्या माध्यमातूनही डाऊनलोड करू शकता. यासाठी सगळ्यात आधी फोनच्या अॅप स्टोरमधून जाऊन वोटर हेल्पलाईन अॅप डाऊनलोड करू शकता. यानंतर मोबाईल नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. जर तुम्ही नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टलवर आधीच रजिस्टर्ड केले नसेल तर ते करावे लागेल. जेव्हा तुम्ही लॉग इन करा तेव्हा सर्च युअर नेम इन इलेक्टोरल रोलच्या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर सर्च करण्यासाठी चार पर्याय येतील. यात सर्च बाय मोबाईल, सर्च बाय बार/क्यूआर रोड, सर्च बाय डिटेल्स अथवा सर्च बाय EPIC नंबर दिले असेल. यातील एका पर्यायामध्ये तुम्ही माहिती भरून सर्चवर क्लिक करू शकता. तुमच्यासमोर वोटर स्लिप येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -