
पाहा तुमची रास आहे का यात?
मुंबई : मे महिन्यात शुक्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र जेव्हा त्याच्या उच्च राशीत असतो तेव्हा तो मालव्य राजयोग तयार करतो. १९ मे रोजी शुक्र हा वृषभ राशीत प्रवेश करणार असून त्यावेळी तो गुरूच्या संपर्कातही येणार आहे. शुक्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजलक्ष्मी राजयोगही तयार होईल. मे महिन्यात मालव्य राजयोग आणि गजलक्ष्मी राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे वृषभ राशीसह काही राशीतील लोकांच्या आयुष्यात सुगीचे दिवस येणार आहेत. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग फार शुभ ठरेल. या काळात तुमच्या संपत्तीत अनेक पटींनी वाढ होईल. तुमच्या जीवनात या राजयोगाचे सकारात्मक परिणाम पडतील. जे स्वत:चा व्यवसाय चालवतात, त्यांच्यासाठी हा राजयोग फायद्याचा ठरेल आणि तुमच्या संपत्तीत भरघोस वाढ होईल. तुम्ही व्यवसायात चांगले पैसे कमवाल. आरोग्याच्या बाबतीत थोडं लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
सिंह रास (Leo)
सिंह राशीतील लोकांना वृषभ राशीतील शुक्राचं संक्रमण फायद्याचं ठरणार आहे. या काळात तुमची करिअरमध्ये प्रगती होईल. तुम्ही खूप दिवसांपासून प्रमोशनची वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा आता संपू शकते. तुम्हाला नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील आणि जे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांनाही फायदा होईल. लग्नाच्या तयारीत असणाऱ्यांची लग्नगाठही बांधली जाऊ शकते.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचं हे संक्रमण त्यांच्या करिअरसाठी शुभ परिणाम देणारं ठरेल. तुम्ही व्यवसायात नवीन कल्पनांवर काम करू शकाल आणि त्यात नशीब तुम्हाला साथ देईल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला फायदा होईल. या काळात अविवाहित लोक विवाहासाठी स्थळ शोधण्यात यशस्वी होतील. तुमचं आरोग्यही चांगलं राहील आणि तुम्हाला तंदुरुस्त वाटाल. तुमच्या भावा-बहिणींशी तुमचे संबंध सुधारतील. आर्थिक बाबतीतही तुमची स्थिती बळकट राहील.
वृश्चिक रास (Scorpio)
मालव्य राजयोग वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येईल. व्यवसायात तुम्हाला काही आव्हानांना सामोरं जावं लागत असलं तरी हळूहळू सर्व गोष्टी सावरतील. या कालावधीत तुम्ही खूप पैसे खर्च कराल, परंतु तुमची कमाई देखील तितकीच असेल. प्रेम संबंधांच्या बाबतीत तुम्हाला काही आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं आणि तुम्हाला प्रकरणात कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल.
मकर रास (Capricorn)
आर्थिक स्थितीच्या दृष्टीने शुक्राचं हे मार्गक्रमण तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे मार्गक्रमण अत्यंत शुभ मानलं जातं. तुम्हाला व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील आणि तुम्ही पैशाची चांगली बचत करू शकाल. लव्हबर्ड्स विवाहबंधनात अडकू शकतात आणि हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल. आरोग्याशी संबंधित एखादी मोठी समस्या उद्भवू शकते.