Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पेण मध्ये

सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पेण मध्ये

पेण नगरपालिकेच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन


पेण(देवा पेरवी)- 32 रायगड लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमदेवार सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आज शुक्रवार दि.26 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12 वाजता पेण नगरपालिकेच्या मैदानावर होणार आहे.


देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा पेणमध्ये येत असून या अगोदर 2016 च्या पेण नगरपालिकेच्या निवडणूकीच्या प्रचारार्थ पेणमध्ये आले होते. त्यानंतर 2019 ला युतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ पेणमध्ये आले होते. आणि आता महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेत आहेत. सदर सभेच्या तयारीसाठी पेण तालुका भाजप, राष्ट्रवादी व मित्र पक्ष मेहनत घेत आहेत.


सदर सभेला पेणचे आमदार रविशेठ पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील, कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, दापोलीचे आमदार योगेश कदम, महाडचे आमदार भरत गोगावले, आमदार ज्ञानेश्र्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित राहणार आहेत.


आज शुक्रवार दि.26 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता पेण नगरपालिकेच्या मैदानावर होणाऱ्या या सभेला पेणकर व रायगडकर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Comments
Add Comment