Wednesday, September 17, 2025

PBKS Vs KKR: बेअरस्टोचे शतक ठरलं कोलकत्तासाठी घातक, ८ गडी राखत पंजाबची सरशी.

PBKS Vs KKR: बेअरस्टोचे शतक ठरलं कोलकत्तासाठी घातक, ८ गडी राखत पंजाबची सरशी.
पंजाबने रचला नवा विक्रम!

PBKS Vs KKR:  पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करनने सुरुवातीला नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकत्तासाठी खेळताना फिल सॉल्टने अर्धशतक झळकावले, त्याचा सलामीचा साथीदार सुनील नारायणनेही अशीच कामगिरी केली. नरेन 32 चेंडूत 71 धावांवर बाद झाला आणि राहुल चहरने त्याची विकेट घेतली.

दरम्यान, सॉल्टने देखील 37 चेंडूत 75 धावा करत सॅम करनच्या चेंडुवर विकेट गमावली. तसेच अर्शदीप सिंगने आंद्रे रसेल (24) आणि श्रेयस अय्यर (28) यांना बाद केल्याने केकेआरने 20 षटकांत 6 बाद 261 धावांचा डोंगर उभा केला.

पंजाब किंग्सने 262 धावांचा पाठलाग कोलकत्ताच्या गोलंदाजांना हैराण करुन सोडलं. जॉनी बेअरस्टो आणि प्रभसिमरन सिंग या जोडगोळीने धावांचा आक्रमकतेने पाठलाग केला. प्रभसिमरन सिंगने सहाव्या षटकात 20 चेंडूत 54 धावांवर आपली विकेट गमावली.त्यानंतर आलेल्या रिले रोसोने १६ चेंडुत २६ धावा बनवत सुनील नारायणच्या षटकात बाद झाला.

नवोदित भारतीय खेळाडु शशांक सिंगने २८ चेंडुत ६८ धावा करत पंजाबसाठी आक्रमक खेळी केली. तर बेअरस्टोने ४८ चेंडुत नाबाद १०८ धावांची खेळी करत पंजाबच्या पारड्यात विजश्री खेचुन आणला. या विजयासोबत पंजाबने सर्वात जास्त धावा परतवून लावण्याचा विक्रम देखील केला आहे.

Comments
Add Comment