
मुंबई: नुकत्याच केलेल्या संशोधनादरम्यान असे समोर आले आहे की ज्या रुग्णांवर महिला डॉक्टरांनी उपचार केले आहे त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होते आणि त्यांना पुन्हा रुग्णालयात जाण्याची गरज कमी पडली. हा शोध एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झाला.
काय म्हणते संशोधन?
टोकियो युनिर्व्हसिटी जपानच्या संशोधनकर्त्यांनी ७०००००हून अधिक मेडिकेअर रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले. यात २०१६ ते २०१९ या दरम्यान यांच्यावर उपचार करण्यात आले. यात ६५ वर्षाहून अधिक वयाचे होते आणि २०१६ ते २०१९ दरम्यान रुग्णालयात उपचार घेत होते.
या संशोधनात सामील साधारण ४६०००० महिला आणि ३२०००० पुरुष रुग्णांमध्ये एक तृतीयांश रुग्णांवर उपचार महिला डॉक्टरांनी केले. या अध्ययनात समोर आले की महिला आणि पुरूष रुग्णांमध्ये ज्यांच्यावर महिला डॉक्टरांनी उपचार केले त्यांचा मृत्यूदर कमी होता.
महिला रुग्णांना फायदे
खासकरून महिला रुग्णांसाठी याचा जास्त फायदा झाला. महिला डॉक्टरांशी महिला रुग्ण अगदी खुलेपणाने आजाराबद्दल बोलू शकतात आणि त्यामुळे व्यवस्थित काळजी घेता येते. तसेच समस्याही नीटपणे मांडल्या जातात.
रिसर्चनुसार हे ही समोर आले आहे की जर महिला डॉक्टरांची संख्या वाढवली तर त्या आपल्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करू शकतात. यासाठी महिलांना डॉक्टर बनण्यासाठी अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे केवळ महिला रुग्णांनाच फायदा होणार नाही तर आपल्या आरोग्य सेवेतही समानता वाढेल.