सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून होते विमान
जयपूर : राजस्थानमधील (Rajsthan) जैसलमेरजवळ भारतीय हवाई दलाचे यूएव्ही विमान (Indian Air Force UAV plane) कोसळल्याची बातमी आहे. विमान नियमित उड्डाण करत असताना सकाळी ९ च्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवित वा वित्तहानी झाली नाही. विमान एका पडक्या भागात पडले आणि जळून खाक झाले. आगीच्या ज्वाळा खूप उंच होत्या, असे आजूबाजूला उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.
भारतीय वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात जैसलमेरच्या पिठला भागात झाला. या घटनेची माहिती मिळताच हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी अपघातस्थळी पोहोचले. तसेच अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीची स्थापना करण्यात आली आहे, असे IAF सांगितले. अपघाताच्या कारणांबाबत सविस्तर अहवाल देण्यात आलेला नाही. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचे समजत आहे.
सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून होते विमान
स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान सीमावर्ती भागावर लक्ष ठेवण्यासाठी नियमित उड्डाण करत होते. जैसलमेरचा हा परिसर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील आहे. वाळवंटाची सीमा पाकिस्तानला लागून आहे. त्यामुळे हे विमान लक्ष ठेवून होते. मात्र, अपघातानंतर विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.