Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेभयंकर! ठाणे पूर्व येथील झाडांवर जादूटोणा

भयंकर! ठाणे पूर्व येथील झाडांवर जादूटोणा

स्वामी समर्थ मठ रस्त्यावरील झाडांवर लाल कपड्यात लिंब आणि खाली नारळाचे उतारे

ठाणे : काळीजादू, जादूटोणा अशा सर्व गोष्टी अंधश्रद्धेचाभाग आहेत. अनेक ठिकाणी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर बंदी घातली असूनही अजही अनेक ठिकाणी ही अंधश्रद्धा पसरत असल्याचे दिसून येते. अशीच एक जादूटोणा झाल्याची घटना भयंकर घटना उघडकीस आली आहे.

‘झाडे लावा झाडे जगवा’ या सामाजिक संदेशाचे पालन अनेक जण करत असताना वाढलेल्या झाडांवर कोपरित अंधश्रद्धेचे प्रकार सुरू आहेत. ठाणे पूर्व मीठबंदर रोड स्वामी समर्थ मठ रस्त्याच्या कडेला झाडांवर अज्ञातांनी लाल कपड्यात लिंब बांधली असून, जादू टोण्याचे उतारे देखील टाकलेले आढळून येत आहेत. ऐन रस्त्याच्या कडेलाच दर्शनी भागात अशी अघोरी कृत्य होत असल्याने परिसरात फिरायला येणाऱ्या व्यक्तींमध्ये भीती निर्माण होत आहे.

ठाणे पूर्व स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला स्थानिक नागरिकांनी झाडे लावून त्यांची जोपासना केली आहे. झाडांनी चांगला जोम धरल्यामुळे या भागात सकाळी आणि संध्या काळ च्या वेळेत नागरिक मोठ्या संख्येने फिरायला येतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथे जादू टोण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. येथील सात ते आठ झाडांना लाल कपड्यात लिंब गुंडाळून लावली आहेत. अंधश्रद्धेवर घाला घालण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अमलात आला असला तरी या आघोरी प्रथा कमी होत नसल्याची खंत स्थानिक नागरिक स्वप्नील कोळी यांनी व्यक्त केली.

याच परिसरात काही दिवसांपूर्वी बोराच्या झाडावर अज्ञात व्यक्तीने आघोरी कृत्य केल्याचे दिसून आले. या झाडावर सात ठिकाणी काळ्या रंगाच्या सात रिबीन बांधून तेथे पूजाअर्चा केली होती. याठिकाणी काही वेळा लाल काळया कपड्यात उतारे देखील काढलेले असतात. त्यामुळें या परिसरातून जाणाऱ्या व्यक्तींमध्ये कळत न कळत भीती वाढताना दिसत आहे.

जीवनाला त्रासलेले, कौटुंबिक समस्या अशा प्रकारातून सुटकारा मिळावा म्हणून काहीजण भोंदू बाबांच्या नादी लागतात. नवस, जादूटोणा इत्यादी अघोरी प्रकाराच्या आहारी जातात. मात्र या मुळे भोंदूबाबाचे फावत आहे. लोकांच्या कमकुवत मनाचा हे बाबा पैसे उकळण्यासाठी उपयोग करून घेतात. त्यामुळे वेळीच लोकांनी जागृत होण्याची गरज आहे, असे ठाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधील वंदना शिंदे यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -