Monday, October 27, 2025
Happy Diwali

Shani: या ५ राशींवर नेहमी राहते शनिदेवाची कृपा, तुमची रास यात आहे का?

Shani: या ५ राशींवर नेहमी राहते शनिदेवाची कृपा, तुमची रास यात आहे का?

मुंबई: न्याय देवता शनी देव(shani dev) नेहमीच चिडलेले नसतात. ते कर्मानुसार लोकांना त्यांचे फळ देत असतात. आज जाणून घेऊया शनी देवाच्या प्रिय राशी कोणत्या आहेत ज्यांच्यावर सदैव त्यांची कृपा राहते.

वृषभ रास

वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र. शुक्र आणि शनीचे संबंध चांगले आहेत. वृषभ राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा नेहमी राहते. यांची बिघडलेली कामे शनीदेव करतात. वृषभ राशीची लोक अनेकदा राजकारणाशी संबंधित असतात त्यांना यश लवकर मिळते.

तूळ रास

तूळ रास ही शनी देवाच्या प्रिय राशींपैकी एक आहे. या राशीच्या लोकांवर शनी देवाचा हात नेहमी असतो. कोणत्याही कठीण काळात शनी देव यांना मदत करतात.

मकर रास

मकर राशीचे स्वामी खुद्द शनी देव आहेत. या राशीचे लोक भरपूर मेहनती आणि एनर्जीने भरपूर असतात. जे काम एकदा मनात घेतले की ते पूर्ण करूनच सोडतात. यामुळे शनी देव अशा लोकांचा हात कधी सोडत नाहीत.

कुंभ रास

कुंभ राशीचे स्वामीही शनीदेव आहेत. त्यामुळे ते त्यांची साथ सोडत नाहीत. या राशीच्या व्यक्तींवर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहते. पैशाच्या तंगीमधूनही ते आपल्या प्रिय राशीच्या लोकांना बाहेर काढतात.

मीन रास

मीन राशीचे स्वामी गुरू आहे. गुरू देव आणि शनी देव यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत. या राशीच्या लोकांवर शनी देव नेहमीच मेहरबान असतात. यामुळे त्यांना शनी देवाचा आशीर्वाद मिळतो.

Comments
Add Comment