
मुंबई: भारतीय शेअर बाजारांमधील(indian share market) लोकांचा इंटरेस्ट आता वाढू लागला आहे. स्टॉक मार्केटबाबत जाणून घेण्याचा फायदा म्युच्युअल फंडनाही होत आहे. याच कारणामुळे म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. एका रिपोर्टनुसार मार्च २०२४ पर्यंत म्युच्युअल एयूएम ५५ लाख कोटी रूपयांच्या वर गेले. देशातील प्रत्येक कोपऱ्यातून आता लोक म्युच्युअल फंडमध्ये पैसे जमा करत आहेत. तुम्हाला माहीत आहे का म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत कोणते राज्य आघाडीवर आहे.
पहिल्या स्थानावर महाराष्ट्र
रिपोर्टनुसार मार्चच्या अखेरीसपर्यंत म्युच्युअल फंडाचे एकूण असेट अंडर मॅनेजमेंट ५५ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे. यात २२ लाख ५१ हजार कोटी रूपये केवळ महाराष्ट्रातून येतात. हा एफएफच्या एकूण एयूएमच्या ४०.९ टक्के हिस्सा आहे. इक्विटी एयूएममध्ये राज्याचा भाग २८.८ टक्के आणि डेटमध्ये ४५.६ टक्के होता. एकूण एयूएमच्या आधारावर म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकण्याच्या यादीत दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे.
कर्नाटक तिसऱ्या स्थानावर
एकूण एयूएमच्या आधारावर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. इक्विटी एयूएममध्येही कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. याचा अर्थ म्युच्युअल फंडाच्या इक्विटी स्कीममध्ये कर्नाटकचे रहिवासी खूप पैसे लावत आहेत. शेअर बाजारमध्ये गुजराती लोक खूप पैसे गुंतवतात. मात्र म्युच्युअल फंडच्या एयूएमच्या आधारावर पाहिले असता गुजरात कर्नाटकच्या नंतर चौथ्या नंबरवर येतो. दरम्यान,इक्विटी एएयूएमबद्दल बोलायचे झाल्यास गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे. डेट एयूएम चौथ्या स्थानावर आहे.