Friday, October 11, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai Metro 3 : मुंबईकरांसाठी खुशखबर! प्रवास होणार आणखी जलद

Mumbai Metro 3 : मुंबईकरांसाठी खुशखबर! प्रवास होणार आणखी जलद

भुयारी मार्गाचा पहिला टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल; अशी असतील मार्गिकेची वैशिष्ट्ये

मुंबई : Colaba-Bandra-Seepz या भुयारी मार्गासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) सज्ज असून या मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडून भुयारी मेट्रोच्या कामाची सातत्याने पाहणी करत कामाचा आढावा घेतला जात असून ३३.५ किमीच्या कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३ (Mumbai Metro 3) मार्गिकेची उभारणी करण्यात येत आहे. संपूर्णत: भुयारी असलेल्या या मार्गिकेचे काम पूर्ण होऊन ही मार्गिका सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी या प्रकल्पास विलंब झाला होता. आता तीन टप्प्यात मार्गिका सुरू करण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे.

दरम्यान, भुयारी मार्गावरील पहिल्या टप्प्याच्या चाचण्या मे अखेरपर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत. त्या हेतूनेच मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (MMRC) तयारी पूर्ण केली आहे. या चाचण्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इंडीपेंडंट सेफ्टी असेसर (ISA) आणि कमिशनअर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (CMRS) यांना तपासणीसाठी बोलविले जाणार आहे. त्याचबरोबर टेलिकम्युनिकेशन यंत्रणा, प्लॅटफॉर्म स्क्रीम डोअर, ट्रॅक्शन आणि रुळ आदींच्या चाचण्यांचा समावेश आहे. तर पुढील आठवड्यापासून मेट्रो गाडीच्या स्टॅटीक लोडसह चाचण्या मे महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन एमएमआरसीने केले आहे.

कधी सुरु होणार मेट्रो ३ मार्गिका?

मेट्रो गाडीच्या स्टॅटीक लोडसह चाचण्या पुर्ण होताच मेट्रो मार्गिका संचलनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया एमएमआरसीकडून सुरु केली जाणार आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार महिन्यांत मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यांची चिन्हे आहेत.

मेट्रो ३ मार्गिकेची वैशिष्ट्ये

पहिला टप्पा : आरे ते बीकेसी
पहिल्या टप्प्यातील एकूण स्थानके: १०
एकूण खर्च : ३७,००० कोटी रुपये
एकूण स्थानके : २७

‘या’ वेळेत धावणार मेट्रो

आरे-बीकेसी मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर येथे सुमारे ९ मेट्रो ट्रेन धावणार आहेत. यापैकी फक्त दोनच मेट्रो ट्रेन देखभाल आणि स्टँडबायसाठी ठेवण्यात येणार आहेत. या मेट्रो ट्रेन सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत धावतील. एक्वा लाइन कॉरिडॉर ३३.५ किमी पर्यंत विस्तारित आहे. या मार्गावर एकूण १० स्थानके असून दररोज सुमारे २६० राउंड-ट्रिप सेवा उपलब्ध असतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -