मुंबई : अनेकजण त्यांच्या आयुष्यात सरकारी नोकरीच्या शोधात असतात. त्यातच तरुण पिढी भारतीय नौदलात (Indian Navy Jobs) नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. अशातच भारतीय नौदलाने तरुणांना नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. भारतीय नौदलाने तब्बल ३००हून अधिक शिकाऊ पदासांठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया चालू झाली आहे.
उमेदवार indiannavy.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करु शकतात. २४ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. येत्या १० मेपर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी फक्त आठवी आणि दहावी परीक्षेत उत्तीर्ण असलेले तरूणही अर्ज करू शकणार आहेत.
भारतीय नौदलात वेगवेगळ्या ३०० शिकाऊ पदांसाठी भरती होणार आहे. यात फिटर पदासाठी ५०, मेकॅनिक पदासाठी ३५, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदासाठी २६ जागा आहेत. शिपराइट १८, वेल्डर १५, मशीनिस्ट १३, एमएमटीएम १३, पाईप फिटर १३, पेंटर ९, इंस्ट्रूमेन्ट मेकॅनिक ७, शीट मेटल वर्कर ३, टेलर ३, पॅटर्न मेकर २, फाऊन्ड्रीमॅन पदासाठीदेखील एक जागा आहे.
भारतीय नौदलात निघालेल्या या भरतीसाठी किमान वयाची अट ही १४ वर्षे आणि कमाल वयाची अट ही १८ वर्षे आहे. बिगर आयटीआय ट्रेडसाठी इयत्ता आठवी पास असणे गरजेचे आहे. फोर्जर हीट ट्रिटर या पदासाठी इयत्ता १० पास असणे गरजेचे आहे.
या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवाराची उंची ही १५० सेमी तर वजन ४५ किलोपेक्षा कमी नसावी. तसे छाती फुगवल्यानंतर ती ५ सेमीपेक्षा कमी नसावी. डोळ्यांची दृष्टी ही ६/६ पासून ६/९ पर्यंत असणे गरजेचे आहे.
भारतीय नौदलात वरील पदांवर नोकरी मिळवण्यासाठी अगोदर उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवारांची मुलाखत होईल. त्यानंतर उमेदवाराची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झाल्यास उमेदवाराला प्रतिमहिना ७७०० ते ८०५० रुपयांचे स्टायपंड मिळेल.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…